शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बडोदा साहित्य संमेलनात छोट्या प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:22 IST

बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामधील ग्रंथप्रदर्शनाला प्रकाशकांनी दिलेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकाशकांना बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करणे शक्य होणार नाही, अशा प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने मदतीचा हात दिला आहे. 

ठळक मुद्देगाळ्यांसाठीच्या नोंदणीची मुदत होती २० डिसेंबर ते २० जानेवारी बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्रीचा खर्च शक्य नसलेल्या प्रकाशक संस्थांसाठी प्रायोजकत्व : बर्वे

पुणे : बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामधील ग्रंथप्रदर्शनाला प्रकाशकांनी दिलेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकाशकांना बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करणे शक्य होणार नाही, अशा प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने मदतीचा हात दिला आहे. ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनातील गाळ्यांसाठीच्या नोंदणीची मुदत २० डिसेंबर ते २० जानेवारी अशी होती. या दरम्यान केवळ ५५ ग्रंथदालनांची नोंदणी झाली होती. कमी प्रतिसादामुळे आयोजकांनी नोंदणी सुरू ठेवल्याने आतापर्यंत ९५ गाळ्यांची नोंदणी झाली आहे. दरवर्षीच्या संमेलनाचा विचार करता ही संख्या कमी असल्याने आणखी गाळ्यांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने प्रकाशकांना सहकार्य करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला.प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, की बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करण्याचा खर्च शक्य नसलेल्या प्रकाशक संस्थांसाठी प्रायोजकत्व दिले जाईल. त्यामुळे त्यांना फारसा खर्च करावा लागणार नाही. सुसज्ज ग्रंथदालन असल्याशिवाय संमेलनात वातावरण निर्मिती होत नाही. दरवर्षीच्या संमेलनात किमान तीनशे गाळे असतात तर पिंपरीच्या संमेलनात चारशे गाळे होते. यंदाचे संमेलन दुसºया राज्यात होत असल्याने प्रकाशकांची कमी असलेली संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ज्या प्रकाशकांनी गाळा नोंदणी केली आहे, अशांना आमच्यातर्फे गाळा दिला जाणार नाही. एका प्रकाशकाला एकच गाळा दिला जाईल. सभासद नसलेल्या प्रकाशकाला आधी सभासद करून घेतले जाईल, त्यानंतर संधी दिली जाईल. ‘आयोजकांनी परवानगी दिली तर आम्ही आणखी ४० गाळ्यांची नोंदणी करण्यास इच्छुक आहोत. यामध्ये गरजू आणि लहान प्रकाशक संस्थांना मदत दिली जाईल. ‘संमेलनाच्या उद्घाटनापर्यंत गाळ्यांची नोंदणी खुली ठेवण्यात येणार आहे. जशी जागा असेल तसे गाळे उपलब्ध करून दिले जातील,’ असे सांगण्यात आले.एका गाळ्यासाठी तीन दिवसांचे चार हजार रुपये भाडे आकारण्यात आले आहे. प्रकाशक किंवा विक्रेत्यांना जास्तीत जास्त तीन गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एक गाळा घेतला, तरी प्रवासखर्च, पुस्तकांच्या वाहतुकीचा खर्च, संमेलनादरम्यान होणारा खर्च किमान २५ हजार रुपये होणार असल्याचे गणित प्रकाशकांनी मांडले आहे. 

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनPuneपुणे