शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
2
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
3
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
4
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
5
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
6
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
7
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
8
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
9
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
10
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
11
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
12
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
13
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
15
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
16
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
17
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
18
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
19
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
20
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

चिंचवडला रंगणार अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 13:57 IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड  आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत्या १३ आणि १४ एप्रिल रोजी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे.

ठळक मुद्देयेत्या १३ ते १४ एप्रिल रोजी आयोजन, लोककलांचा अविष्कार, परिसंवाद आणि पठ्ठे बापूरावांचे स्मरण.

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड  आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत्या १३ आणि १४ एप्रिल रोजी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे. या संमेलनात महाराष्ट्रातील लोककलांचा आविष्कार, महाराष्ट्राची लोकधारा, विविध विषयांवर परिसंवाद आणि लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची स्मृती जागविणारे कार्यक्रम , असे आकर्षण असणार आहे. या संमेलनात महाराष्ट्राची कलासंस्कृती सादर होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला स्वागत समिती अध्यक्ष महापौर नितिन काळजे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप आणि स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हे संमेलन होणार आहे. संमेलन स्थळाला शाहीर पठ्ठे बापूराव नगरी तर व्यासपीठाला शाहीर योगेश असे नाव देण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ .३० वाजता चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिरापासून ते प्रेक्षागृहापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद घाटन सोहळा होईल. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या संतसाहित्य व लोककलांचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सोहळ््यात लोककलेत अमूल्य योगदान देणाºया व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध लावणी कलावंत आणि चित्रपट अभिनेत्री लीलाताई गांधी, साहित्याच्या माध्यमातून लोककलेला प्रकाशात आणणारे लेखक प्रभाकर मांडे यांच्यासह वसंत अवसरीकर (सोंगाड्या), मुरलीधर सुपेकर (शाहीर), संजीवनी मुळे नगरकर (लोकनाट्य) प्रतिक लोखंडे (युवा शाहीर),सोपान खुडे (साहित्य), पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तन), बापूराव भोसले (गोंधळी) सन्मान करण्यात येणार आहे.  तसेच वसंत अवसरीकर (सोंगाड्या),मुरलीधर सुपेकर (शाहीर), संजीवनी मुळे नगरकर (लोकनाट्य) प्रतिक लोखंडे (युवा शाहीर),सोपान खुडे (साहित्य), पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तन), बापूराव भोसले (गोंधळी) आदींचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी संत कवयित्री अभिव्यक्ती आणि लोकवाणी या विषयावर परिसंवाद होणार आहेत. त्यामध्ये डॉ. विद्याधर पाटगणकर, श्री प्रमोद महाराज जगताप. डॉ. सिसिलिया कार्व्होर्लो. डॉ. लीला गोविलीकर,विद्याधर जिंतीकर इत्यादी सहभागी होणार आहेत. मानवंदना पठ्ठे बापूरावांना त्यानंतर सायंकाळी दरम्यान स्थानिक कलावंतांचा कलाविष्कार सादर होणार आहे. यात सनई चौघडा ,वासुदेव, कडकलक्ष्मी, पोतराज, शाहीर,कोकणी बालनृत्य,वारकरी दिंडी, गोंधळ यांसारख्या यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर लोकरंग प्रस्तुत पंचरंगी पठ्ठेबापूराव या कार्यक्रमातून पठ्ठे बापूरावांना मानवंदना देण्यात येणार आहे. त्याचे संकल्पना लेखन डॉ. प्रकाश खांडगे यांचे असून दिग्दर्शन प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांचे आहे. त्यात शकुंतला नगरकर,प्रमिला लोदगेकर यांच्यासह अनेक कलाकार सहभागी होणार आहे.  संमेलनाच्या दुसºया दिवशी शनिवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांची मुलाखत राजेंद्र हुंजे, नाना शिवले घेणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात पारंपारिक तालवाद्य कचेरी, लोककला तालाविष्कार सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन संतोष घंटे करणार आहेत. यामध्ये दत्तोबा पाचंगे (चौघडा), राहुल कुलकर्णी, (ढोलकी),नंदकुमार भांडवलकर (मृदंग) विलास अटक (संबळ),श्याम गोराणे सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी गोवा कला अकादमी अनिल सामंत असणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता लोककलांच्या संवर्धनात माध्यमांची भूमिका सकारात्मक की नकारात्मक या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी लोकमतचे पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर असणार आहेत, या परिसंवादात डॉ. दीपक टिळक (संपादक केसरी) ; राही भिडे (संपादक पुण्य नगरी), सम्राट फडणीस (संपादक सकाळ); मुकुंद संगोराम (संपादक लोकसत्ता) पराग करंदीकर (संपादक महाराष्ट्र टाईम्स); आल्हाद गोडबोले (संपादक पुढारी) अरुण निगवेकर (सामना) हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रधार डॉ. प्रकाश खांडगे असणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता समारोप सोहळा होणार असून यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, कवी रामदास फुटाणे हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री ८.३० वाजता प्रसिद्ध नृत्यांगना तेजश्री अडीगे दिग्दर्शित नृत्य कला मंदिर आयोजित महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यामध्ये सामना ते थापाड्या या मराठी चित्रपटापर्यंतच्या लावण्या लोककलावंत सादर करणार आहेत. 

 

  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडgirish bapatगिरीष बापटShrinivas Patilश्रीनिवास पाटीलramdas phutaneरामदास फुटाणे