शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा माझी श्रद्धांजली सभा घ्यावी लागली असती; अजित पवारांनी सांगितला 'तो' जीवघेणा प्रसंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 21:27 IST

'मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली.'

बारामती- बारामती तालुक्यातील पवईमाळ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनुभवलेला जीवघेणा अनुभव कथन केला. तो प्रसंग बारामतीकरांनी अक्षरशः श्वास रोखुन ऐकला.

शनिवारी पुण्यात घडलेल्या प्रसंगावर त्यांनी यावेळी  मिश्किलपणे माहिती दिली. पवार म्हणाले, तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो, पण मध्येच वीज गेली. अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो. अन्यथा आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती, असा जीवघेणा अनुभव विरोधी पक्षनेते पवार यांनी  सांगितला. 

पवार हे काल पुणे दौऱ्यावर होते. पुणे येथील हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर जाताना लिफ्ट बंद पडली. काही क्षणात लिफ्ट चालू होऊन काही कळायच्या आत थेट जमिनीवर आदळली. लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो. नाहीतर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली.

मात्र आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहवलं नसल्याचे सांगत  पुण्यातील प्रसंग सांगितला."काल वडिलांचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम असल्याने त्यांचा श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीला आलो. मात्र घडलेला प्रसंग मी सुनेत्राच्या कानावरही घातला नाही, कुटुंबियांनाही सांगितला नाही. प्रसंग बाका होता पण त्यातून आम्ही वाचलो", असे  पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामती