शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

‘माळेगाव’ची सत्ता गेल्याने अजित पवारांना दु:ख

By admin | Updated: March 27, 2017 01:59 IST

केंद्र व राज्यातील सत्ता गेली. त्या पाठोपाठ पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता गेली, त्याचे अजित पवारांना दु:ख नाही, परंतु

बारामती : केंद्र व राज्यातील सत्ता गेली. त्या पाठोपाठ पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता गेली, त्याचे अजित पवारांना दु:ख नाही, परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता गेल्याचे दु:ख त्यांना आहे. त्यामुळे सातत्याने माळेगाव कारखान्याच्या बाबत संभ्रम आणि दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. त्यांच्या ताब्यातील खासगी, सहकारी कारखान्यांचे विस्तारीकरण केले जात आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध केला जात आहे. कारण, जादा दरामुळे गेटकेनचा ऊसदेखील माळेगावलाच मिळेल. दराबाबत त्यांच्या कारखान्यांना स्पर्धा करावी लागेल, अशी भीती त्यांना आहे, अशी टीका ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केली. स्पर्धेत टिकण्यासाठी विस्तारीकरण...दौंड शुगर, अंबालिका, जरंडेश्वर, शरयू आदी खासगी आणि सहकारी कारखाने विस्तारीकरण करीत आहेत. त्याचे त्यांना काही नाही, पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण होणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. विस्तारीकरणाच्या ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत घेतला आहे. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, तर विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. विस्तारीकरणानंतरदेखील कारखान्याच्या सभासदांच्या दरात काही फरक पडणार नाही, याची काळजी घेणार आहे. माळेगावच्या तुलनेत अन्य कारखान्यांचे दर कमी...माळेगाव कारखान्याने सन २०१५/२०१६ च्या हंगामात २८०० रुपये सर्वाधिक दर दिला. त्या तुलनेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २२२७ रुपये दर दिला. सोमेश्वरने २२५४ रुपये दर दिला. अंबालिका शुगरने २२५० रुपये, दौंड शुगरने २३०० रुपये आणि बारामती अ‍ॅग्रोने २१५० रुपये एफआरपीचा दर दिला. सोमेश्वर कारखान्याचा ५७३, छत्रपतीचा ५४५, अंबालिकाचा ५५०, दौंड शुगरचा ५०० आणि बारामती अ‍ॅग्रोचा ६५० रुपये दर माळेगाव कारखान्यापेक्षा कमी होता. त्यामुळे या कारखान्यांच्या ऊस उत्पादकांना २२७ कोटी ११ लाख ८५ हजार रुपये मिळाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असल्याचे तावरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अजित पवार यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप... माळेगावचे विस्तारीकरण झाल्यास जादा उसाची लूट खासगी कारखान्यांना करता येत नाही. अजित पवार यांच्या खासगी कारखान्यांनी उसाची लूट करता येणार नाही, त्यामुळेच माळेगावच्या विस्तारीकरणाला विरोध केला जात. छत्रपती कारखाना लुटून मोकळे झाल्यावर विस्तारीकरण, सहवीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. त्या अगोदर त्यांच्या खासगी कारखान्यांचे विस्तारीकरण केले.  सहकाराचे पुरस्कर्ते असल्याचे सांगणारे अजित पवार खासगी कारखान्यांना फायदा होईल, असे वर्तन त्यांचे आहे. अजित पवार यांनी शेतकऱ्यांची लूट केली. ते शेतकऱ्यांचे ‘लुटारू’ नेते आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांना माळेगाव अथवा कोणत्याही सहकारी कारखान्याच्या दराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ४सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खासगी कारखान्याच्या टोळ्या पडल्यामुळेच त्या कारखान्याच्या संचालक मंडळाने अजित पवार यांना न सांगता २७५० चा दर देण्याचा निर्णय घेतला, असल्याचे सांगून अजित पवार यांनी याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका त्यांनी केली. सभासदांना संभ्रम करणारी पत्र पाठविण्याचा प्रपंच केला जात आहे. माळेगावचे विस्तारीकरण करू नये, यासाठी जाहीर सभेत सांगतात. त्याच बरोबर त्यांच्या संचालकांनी मुंबई हायकोर्टात पत्र दिले आहे, ही वस्तुस्थित आहे. न्यायालयाची परवानगी घेऊनच विस्तारीकरण मार्गी लावणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.