शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सौर उर्जेने उजाळणार विमानतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:58 IST

लोहगाव विमानतळ सौर उर्जा प्रकल्प उभारणारे देशातील चौथे विमानतळ आहे.

ठळक मुद्देविमानतळावर ३०० किलोवॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू

पुणे : लोहगाव विमानतळ पुढील महिन्यापासून सौरउर्जेने उजळून निघणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ३०० किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यातून विमानतळावरील प्रकाश व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा तसेच अन्य काही दैनंदिन वीजवापराच्या उपकरणांना ही वीज मिळणार आहे.मागील काही महिन्यांपासून लोहगाव विमानतळावर अनेक सुधारणा केल्या जात आहे. विमानतळावरील बैठक व्यवस्थेत वाढ, स्वच्छतागृहांचे नुतनीकरण, सुरक्षाव्यवस्था, पार्किंग अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामध्ये आता सौरउर्जा प्रकल्पाची भर पडणार आहे. विमानतळावर ३०० किलोवॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी नोव्हेंबरमध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सध्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दि. २० एप्रिलपर्यंत हे काम पुर्ण होण्याची शक्यता असल्याचे संचालक अजय कुमार यांनी सांगितले. देशात कोची, बेंगलोर व चेन्नई येथील विमानतळांवरच सध्या असा प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळ सौर उर्जा प्रकल्प उभारणारे देशातील चौथे विमानतळ ठरणार आहे.सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रामुख्याने विमानतळावरील प्रकाश व्यवस्थेसाठी याचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही व अन्य काही उपकरणांसाठी सौरउर्जेचा वापर होईल. त्यामुळे विमानतळ प्रशासनाचे वीजवापरासाठी दरवर्षी खर्च होणारे लाखो रुपये वाचणार आहेत. तसेच वीजेचीही बचत होणार असून त्याचा अन्य कारणांसाठी वापर करता येईल.

.............................

या प्रकल्पामुळे विमानतळ वीज वापराबाबत काही प्रमाणात स्वयंपुर्ण होणार आहे.विमानतळावर ३०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. पण त्यापुर्वी २० तारखेपर्यंत प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. - अजय कुमार, संचालक , लोहगाव विमानतळ

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळLohgaonलोहगाव