शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 20:56 IST

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देभूसंपादन : अधिसूचनेची प्रतिक्षाअंदाजे ८०० कोटी रुपयांचा मोबदला शेतक-यांना

पुणे: राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्यात आली असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द केल्या झाल्यानंतरच विमानतळासाठी लागणा-या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू होईल,असे जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभागातील अधिका-यांनी सांगितले.पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातही जमीन भूसंपादनास अंदाजे २ हजार २७१ कोटी आणि फळझाडे, विहिरी,ताली आदीसाठी अंदाजे ८०० कोटी रुपयांचा मोबदला शेतक-यांना द्यावा लागू शकतो. मात्र, कोणत्या गावातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार असून त्यासाठी किती खर्च येईल याची अचूक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तसेच विमानतळाच्या सीमारेषाही अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.विमानतळासाठी संपादित केल्या जाणा-या जमिनीमुळे एकही गावठाण बाधित होणार नाही; याची काळजी घेतली जाणार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते. त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव,खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाची वाडी या सात गावांतील कोणत्या गट क्रमांकातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार याबाबतची माहिती घेण्याची प्रक्रिया स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथेरोटीकडून सुरू आहे. जमिनीसंदर्भातील अचूक माहिती प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द होईल. त्यामुळे शासनाकडून भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात भूसंपादन सुरू करण्यास अजून काही कालावधी थांबावे लागणार आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळSaurabh Raoसौरभ राव