पुणे : प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुखकर व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) काही मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या बसचा दररोजचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याने ‘पीएमपी’ला तोटा सहन करावा लागत आहे. खर्चाच्या तुलनेत निम्मेही उत्पन्न मिळत नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.‘पीएमपी’ने काही मार्गावर प्रवाशांच्या गरजेनुसार वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून दिली आहे. सध्या हडपसर ते निगडी, हिंजवडी ते विमानतळ आणि कात्रज ते निगडी या मार्गावर एकूण नऊ बसमार्फत ही सेवा सुरू आहे. विमानतळ तसेच हिंजवडी भागातये-जा करणाऱ्या आयटी कंपन्यांमधील अधिकारी व कर्मचाºयांना आकर्षित करण्यासाठी पीएमपीने या मार्गावर ही सेवा सुरू केली आहे. तसेच हडपसर ते निगडी आणि कात्रज ते निगडी या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाºया प्रवाशांची संख्याही मोठी आहे. सध्या सुरू असलेल्या बससेवेलाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. एसी बसला प्रतिकिलोमीटर खर्च सुमारे शंभर रुपये एवढा येतो. इतर बसचा खर्च ७० ते ८० रुपयांपर्यंत असतो. हडपसर ते निगडी या मार्गावर मार्च महिन्यात एसी बसने केवळ ५ हजार ४१० प्रवाशांनी प्रवास केला आहे.त्यातून सुमारे २ लाख ८७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर प्रति किलोमीटर उत्पन्न सुमारे ४३ रुपये एवढे होते. हिंजवडी ते विमानतळ या मार्गावर अधिक प्रवासी मिळतील, अशी पीएमपीची अपेक्षा फोल ठरत आहे. मार्च महिन्यात केवळ ४ हजार ४७९ प्रवाशांनी या बसला प्रतिसाद दिला. या मार्गावर प्रतिकिलोमीटर उत्पन्न केवळ ३० ते ३१ रुपये होते. त्यातुलनेत कात्रज ते निगडी मार्गावर बरा प्रतिसाद असून, सरासरी प्रतिकिलोमीटर ४८ रुपये उत्पन्न मिळाले.>तिकीटदर कमी करण्याचा प्रस्तावहडपसर ते निगडी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर एसीबससेवा दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलीआहे. या बसला मिळणारा प्रतिसाद पाहून सेवासुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणारआहे. सध्या या मार्गासह इतर मार्गांवरही फारसा प्रतिसाद मिळत नाही. तिकीट दर १०० ते १४० रुपयांपर्यंत असल्याने प्रवासी कमी मिळत आहेत. त्यामुळे तिकीट दर कमी करण्याचा प्रस्ताव असून, त्याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती ‘पीएमपी’तील अधिकाºयांनी दिली.>एसी बसचे मार्च महिन्यातील मार्गनिहाय उत्पन्न व प्रवासी (बससंख्या)मार्ग प्रवासी उत्पन्न प्रतिकिमी उत्पन्नहडपसर ते निगडी (१) ५४१० २,८७,०१५ ४३.२४निगडी ते हडपसर (१) ३८६१ २,१५,२६० ३१.९२हिंजवडी ते विमानतळ (२) ४४७९ ४,७३,७९५ ३०.७५कात्रज ते निगडी (५) ३१७६५ १६,०९,९८१ ४७.७६
वातानुकूलित पीएमपी बसला ‘थंड’ प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:16 IST