शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या कुरिअर कंपनीत स्फाेट झालेले पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:43 IST

अहमदनगर येथील एका कुरिअर कंपनीमध्ये स्फाेट झालेले पार्सल पुण्यातील काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरहद या संस्थचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने असल्याचे समाेर अाले अाहे.

ठळक मुद्देकुरिअर कंपनीच्या अाॅफिसमध्ये झाला पार्सलचा स्फाेटपार्सल संजय नहार यांच्या नावाने असल्याने चर्चांना उधाण

पुणे : अहमदनगर येथील एका कुरिअर आॅफिसमध्ये स्फोट झालेले पार्सल पुण्यातील सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने  पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. हे पार्सल कोणी पाठवले, त्यामागील हेतू काय याबाबतच्या चर्चांना उधाण आले असून, अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये काम करत असल्याने धमकीचे फोन अथवा संदेश येत असतात. मात्र एवढा मोठा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे संजय नहार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.     अहमदनगरमधील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कंपनीमध्ये संजय नहार यांच्या नावाने एक पार्सल आले होते. या पार्सलच्या स्फोटाने कंपनीतील दोन कर्मचारी जखमी झाले. पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीच्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.     याबाबत लोकमतशी बोलताना नहार म्हणाले, सरहद संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी काम सुरु आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरमधील काम थांबवा, अश्या आशयाच्या धमक्या फोन आणि संदेशाच्या माध्यमातून येत होत्या. मात्र पार्सल येण्याची घटना पहिल्यांदाच घडली असून याबाबत पोलीस वेगाने तपास करत आहेत. पोलीसांनी सुरक्षा घेण्याचे आवाहन केले आहे. एका कामानिमित्त गुरुवारी पंजाबचा दौरा सुनियोजित होता. मात्र या घटनेमुळे काही दिवस शहराच्या बाहेर पडू नये असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. स्फोटामुळे माझ्यावरील संकट टळले असले तरी कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यांबद्दल  दु:ख वाटत आहे. 

टॅग्स :PuneपुणेSanjay Naharसंजय नहारSarhadसरहद संस्था