शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकारी-कर्मचारी जाणार शेतीच्या बांधावर:  सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:40 IST

पेरणी कालावधीत बांधावर जाऊन बियाणे, खते अधिकृत आणि कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे वापरली जातात की नाही हे या भेटीदरम्यान पाहिले जाईल.

ठळक मुद्देशिफारस केलेल्या खते-बियाणांच्या वापराची करणार पडताळणीबांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यासोबत संबंधिताला सेल्फी देखील काढावा लागणार

पुणे : कोणत्या पिकाची पेरणी होते, खते आणि बियाणांचा कसा वापर शेतकरी करतात याची अचूक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागातील शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना बांधावर जाण्याचा आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी दिला.  खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. खोत म्हणाले, कृषी विभागाचा प्रत्येक अधिकारी कर्मचारी बांधावर जाईल असे नियोजन करण्यात आले आहे. अनेकदा पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बियाणांची तक्रार केली जाते. त्यामुळे पेरणी कालावधीत बांधावर जाऊन बियाणे, खते अधिकृत आणि कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे वापरली जातात की नाही हे या भेटीदरम्यान पाहिले जाईल. तसेच, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अधिकाºयांमार्फत खते आणि बियाणांची निवड, तसेच वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. बोगस किटकनाशके, खते, बियाणांच्या विक्रीला आळा बसावा यासाठी तालुका, जिल्हा आणि आयुक्तालय स्तरावर पथके स्थापन करण्यात येतील. या तपासणीत संबंधित परवानाधारकाकडे परवान्या व्यतिरिक्त इतर बियाणे आणि किटकनाशके आढळल्यास संबंधिताचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच, त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील दिली जाईल. प्रत्येक परवानाधारकाने मालाची पावती देणे बंधनकारक आहे. विनापावती विक्री करताना आढळल्यास, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. गेल्या वर्षी बोंड आळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ हजार ६०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस उत्पादन क्षेत्रात तालुकानिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच, कापसाचे देशी वाण वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदा १५२ लाख हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज असल्याचे खोत म्हणाले. ------------------------सेल्फी विथ फार्मर पिकांच्या पेरणीचा यंदाचा कल समजावा, बियाणे आणि खतांचा वापर कृषी विभागाच्या शिफारशींनुसार होतोय की नाही, हे पाहण्यासाठी या खरीप हंगामापासून कृषी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शेताच्या बांधावर जावे लागणार आहे. बांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यासोबत संबंधिताला सेल्फी देखील काढावा लागणार आहे. तशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खरीप आढावा बैठकीत दिल्या. त्याबाबत पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता त्यांनी सेल्फीबाबत बोलणे टाळले. मात्र, शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व व्यक्ती बांधावर जातील, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी