शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार मध्य प्रदेशवर मेहेरबान तर महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक; कृषीमंत्री दादा भुसेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:54 IST

पिक विम्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राने बीड पॅटर्न विकसित केला.केंद्र सरकारने त्याला परवानगी नाकारली...

पुणे: पिक विम्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राने बीड पॅटर्न विकसित केला. मात्र, केंद्र सरकारने त्याची परवानगी मध्यप्रदेशला दिली व महाराष्ट्राला नाकारली, असा आरोप कृषी मंत्री दादा भुसे यांनी केला. 

रब्बी हंगामाच्या राज्य नियोजनासाठी भुसे मंगळवारी पुण्यात आले होते. कृषी आयुक्त कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांबरोबर बोलताना मंत्री भुसे म्हणाले, पिक विमा कंपन्या अवाजवी फायदा करून घेतात. मागील वर्षी केंद्र राज्य व शेतकरी यांच्याकडून पिक विम्यापोटी ५ हजार ८०० कोटी जमा झाले. फक्त १ हजार कोटी वाटप झाले. म्हणजे  ४ हजार कोटीचा नफा झाला. यावर उपाय म्हणून आम्ही बीड पॅटर्न काढला. यात कंपन्यांनी १० टक्के प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा इतकीच रक्कम जमा पिक विम्यातून घ्यायची. उर्वरित रक्कम सरकार जमा ह़ोईल. त्याचे वाटप राज्य सरकार शेतकऱ्यांना करेल. त्यापेक्षा जास्त नुकसान असेल तर ती रक्कम सरकार देईल.

बीड जिल्ह्यात यशस्वीपणे हा पॅटर्न राबवला गेला अशी माहिती देऊन भुसे म्हणाले,  आम्ही केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्याकडे संपूर्ण राज्यात तो राबवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यात हा विषय होता. पण आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. हाच पॅटर्न राज्यातील राबवण्यास केंद्र सरकारने मध्यप्रदेश सरकारला मात्र २ ऑगस्टला परवानगी दिली असे भुसे यांनी सांगितले. 

विमा कंपन्यांना इतका नफा मिळतो तो कशासाठी असा प्रश्न भुसे यांनी केला. फायदा शेतकचा व्हायला हवा. त्यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांसाठी तरी हा बीड पँटर्न राबवण्यास केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी नव्याने करत असल्याचे भूसे म्हणाले. तोपर्यंत कंपन्यांनी टाकलेल्या सर्व नियम अटींचे काटेकोर पालन करण्यासंबधी शेतकरी,क्रुषी अधिकारी यांना कळवण्यात आले असल्याची माहिती भुसे यांनी दिली. यावेळी फलोत्पादन मंत्री सांदिपान भुमरे, कृषी आयुक्त धीरजकुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती