शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल

By नितीन चौधरी | Updated: September 22, 2022 20:55 IST

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते...

पुणे : “महाविकास आघाडी सरकारच्या दुकांनामधून वाईन विकण्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्यास वाईन परवान्याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील,” असे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, “चारही कृषी विद्यापीठांच्या अडचणी गुरुवारच्या बैठकीत जाणून घेतल्या. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी दर्जेदार शिक्षण द्यावा असा प्रयत्न आहे. भविष्यात शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल या दृष्टीने चर्चा केली. शेती क्षेत्रात अनेक नवीन रोग आले, ते नष्ट कसे होतील यावर कायमस्वरुपी उपाय शोधले जातील.

वाईन धोरणासंदर्भात शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात येतील. कृषीमंत्री म्हणून मी याबाबत सकारात्मक आहे. यापुढे राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शेतकऱ्यांना काय अडचणी येतात ते जाणून घेऊ, असेही सत्तार म्हणाले.

शिक्षण विभागाची यादी बनावटमाझ्या मुलीचा पगार २०२० मध्येच बंद झाला होता. टीईटी घोटाळ्याबाबत अनेक आरोप झाले आहेत. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्या वेळी माझ्यावर आरोप होतात. मी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चाैकशीची विनंती केली आहे. त्यानंतर मुख्य सचिव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही यादी शिक्षण विभागाने केलेली नाही. ही यादी बनावट आहे, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला.

गेल्या सरकारने काहीच केले नाही“मला आश्चर्य वाटत आहे. गुजरात सरकारने ज्या सुविधा देत आहे त्या आपण द्यायला हव्या होत्या, खरेतर आधीच्या सरकारमध्ये मी होतो, आदित्य ठाकरे होते ही सामूहिक जबाबदारी होती, आम्ही त्यात कमी पडलो. मागच्या सरकारने २ वर्ष काहीच केले नाही. माजीमंत्री सुभाष देसाई हे तर आमचाही रामराम घेत नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा टोलाही सत्तार यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी जे केले ते योग्य होते का?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत सत्तार म्हणाले, “मी फार जवळून त्यांना बघितले नाही, भाजपसोबत युती तोडल्यानंतर त्यांनी जे केले ते इमानी इतबारे होते का? एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. रिक्षावाला म्हणून ओळखतात मग रिक्षामध्ये ५० लोक (आमदार) कसे बसलेत याचा विचार केला का? शिवसेनेने सत्ता स्थापन करताना जो धोका दिला तेव्हा ती सती सावित्री होती का?,” असा सवालही सत्तार यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेAbdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे