शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

पिवळे कलिंगड खातेय भाव! पुरंदर तालुक्यातील पहिलाच प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:35 IST

शेतीला आधुनिक तंत्राची जोड दिली तर शेती फायदेशीर होते. पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील उच्चशिक्षित प्रियंका मेमाणे यांनी आधुनिक तंत्राची जोड देऊन आधुनिक शेतीचा प्रयत्न केला आहे. मेमाणे कुटुंबीयांनी पारगाव मेमाणे येथे अक्षरश: माळरानावर दहा एकर क्षेत्र विकसित केले आहे.

जेजुरी - शेतीला आधुनिक तंत्राची जोड दिली तर शेती फायदेशीर होते. पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील उच्चशिक्षित प्रियंका मेमाणे यांनी आधुनिक तंत्राची जोड देऊन आधुनिक शेतीचा प्रयत्न केला आहे. मेमाणे कुटुंबीयांनी पारगाव मेमाणे येथे अक्षरश: माळरानावर दहा एकर क्षेत्र विकसित केले आहे. यातील सहा एकर क्षेत्रावर डाळिंब, सीताफळ, पेरु यांच्या फळबागा निर्माण केल्या आहेत. पाण्याच्या नियोजनासाठी शेताच्या एका बाजूला ११०७/१४० फूट लांबी, रुंदीचे एक कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळे निर्माण केले आहे. प्रियंका मेमाणे यांनी स्वत: पुढाकार घेत यातीलच एक एकरावर सेंद्रिय वाण असलेल्या पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आहे.तैवानच्या नोन यू सीड्स कंपनीने विकसित केलेले आतून लाल आणि बाहेरून पिवळा रंग असणारे विशाला जातीचा वाण आणि बाहेरून हिरवा मात्र आतून पिवळा असणाऱ्या मस्तानी वाणाची लागवड करून एक वेगळी शेतीची पायवाट अवलंबली आहे. या दोन्ही वाणांबरोबर मन्नत जातीच्या कलिंगडाचीही लागवड केली आहे. मेमाणे यांचा हा पुरंदर तालुक्यातील पहिलाच प्रयोग असून, या पिवळ्या रंगाच्या कलिंगडाने चांगलाच भाव खाल्ला आहे.या तीनही जातीच्या कलिंगडांना सरासरी १५ रुपये किलोचा दर मिळाल्याने त्यांना यातून मोठे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत त्यांनी १० टन कलिंगडाची विक्री करून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. शिवाय अजूनही १५ टन माल शेतात आहे. साधारणपणे २५ टनापेक्षा जास्त माल मिळणार याची खात्री असल्याने तीन लाखांवर उत्पन्नाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे