शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीवर कराराचा उतारा!, साखर कारखाने आता करणार थेट शेतकऱ्यांशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 01:25 IST

साखरेला फारसा भाव नसल्याने साखर कारखान्यांसमोर उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यात अडचण आहे. हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे.

पुणे : साखरेला फारसा भाव नसल्याने साखर कारखान्यांसमोर उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यात अडचण आहे. हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे. यावर उपाय म्हणून कारखान्यांनी आता उर्वरित हंगामासाठी शेतक-यांशी थेट करार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. करारानुसार दोन वा तीन हप्त्यात एफआरपीची रक्कम शेतक-यांना दिली जाईल.शुगरकेन कंट्रोल १६६ च्या कायद्यानुसार शेतक-यांना ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकºयांना देण्यात आले. थकबाकीदार कारखान्यांविरोधात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रेव्हेन्यू रिकव्हरी सर्र्टिफिकेट (आरआरसी) बजावले आहे. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर काही कारखान्यांनी ५० कोटींचा भरणा केला आहे.कायद्यानुसार शेतकºयांशी करार न केल्यास १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. करार असल्यास एफआरपी हप्त्यात देता येते, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. याचा अर्थ कारखान्याला एफआरपीपेक्षा कमी रक्कम देता येणार नाही. एखाद्या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेतील टप्पा पद्धतीचा ठराव अथवा निर्णय ग्राह्य धरला जाणार नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकºयाशी स्वतंत्र करार करावा लागेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. राज्यातील ८ कारखान्यांनी सर्वसाधारण सभेत दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा ठराव केला आहे. त्यांना देखील शेतकºयांशी थेट करारच करावा लागेल.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने