शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

पुणे विद्यापीठात ABVP चे आक्रमक आंदोलन; तोडफोड करत कुलगुरुंच्या अंगावरती निवेदन फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:18 IST

पुणे विद्यापीठात ABVP चे आक्रमक आंदोलन...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. अखिल भारतीय विद्यार्थ्यांनी मुख्य सभेत जाऊन आंदोलन करत तोडफोड केली व निवेदन कुलगुरू यांच्या अंगावरती भिरकवली.

विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल मिटिंगमध्ये हे विद्यार्थी घुसले. त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या समोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या आम्ही ऐकून घेतल्या आहेत. त्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती कुलगुरू कारभारी काळे यांनी यावेळी दिली. आम्ही कुठलीही तोडफोड केली नाही यापूर्वी आम्ही विद्यापीठात कुलगुरूंना निवेदनही दिलं होतं. विद्यापीठात प्रत्येक गोष्टीला परवानगी घ्यावी लागते मात्र रॅप साँगला परवानगी दिली कोणी, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ABVP च्या मागण्या-

- विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँगचे शुटिंग झाले कसे याची चौकशी व्हावी.

- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा व डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रवेश प्रलंबित आहे ते लवकरात लवकर देण्यात यावे.

- परीक्षांचे प्रलंबित निकाल व लागलेल्या निकालांमध्ये चुका झालेल्या आहेत. त्या दुरूस्त कराव्यात.

- स्पोर्ट स्टेडियमचे उद्घाटन होऊन देखील विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी आहे त्यावर योग्य निर्णय घ्यावा.

- BScBEd च्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा १००% लाभ न देण्यात याव्यात या मागण्या यावेळी केल्या.

विद्यापीठात रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी शुभम आनंद जाधव (वय २४, रा. जयभवानीनगर, पाषाण) याच्याविराेधात चतु:श्रृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुधीर दळवी (वय ५०) यांनी फिर्याद दिली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची काेणतीही लेखी परवानगी न घेता हे गाणे चित्रित केल्याचे समोर आले आहे.

त्यांनी अनधिकृतपणे मुख्य इमारतीच्या संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती हाॅलमध्ये प्रवेश केला. हेरिटेज बिल्डिंग वर्ग १ मध्ये तलवार, पिस्तुलाचा वापर करीत अश्लील शब्दांचा वापर सार्वजनिक ठिकाणी करत चित्रीकरण केले आणि चित्रफीत प्रसारित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

तरुणांनी सुरक्षा यंत्रणा भेदली कशी?

विद्यापीठ प्रशासनाची चित्रीकरणासाठी परवानगी नसताना तरुणांनी या ऐतिहासिक वास्तूमध्ये सुरक्षा यंत्रणा भेदून चित्रीकरण केलेच कसे? याप्रकरणी सुरक्षा विभागातील दाेषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune universityपुणे विद्यापीठ