शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वय अवघे ५, चित्रे काढली ३००; आरुषने काढलेल्या चित्रांचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:02 IST

अहमदनगरच्या आरुषने वयाच्या दीड वर्षापासून चित्रे काढायला सुरुवात केली. आरुष आता पाच वर्षांचा असून, त्याने आतापर्यंत ३००हून अधिक चित्रे काढली आहेत.

ठळक मुद्देचित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले प्रदर्शनाचे उद्घाटनपालकांनी पाल्याला त्याची आवड जोपासण्याची मुभा द्यावी या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले

पुणे : सध्याच्या काळात मुले ही कलेपासून दूर जात असून, मोबाईलच्या आहारी गेली असल्याचे चित्र पाहायला मिळते. अहमदनगरच्या आरुषची गोष्ट मात्र निराळीच आहे. वयाच्या दीड वर्षापासून त्याने चित्रे काढायला सुरुवात केली. आरुष आता पाच वर्षांचा असून, त्याने आतापर्यंत ३००हून अधिक चित्रे काढली आहेत. यातील निवडक शंभर चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बालसाहित्यिक ल. म. कडू, लेखक महावीर जोंधळे आदी उपस्थित होते. आरुष गिरमकर दीड वर्षाचा असल्यापासून चित्रे काढू लागला. त्याची आई प्राजक्ता गिरमकर यांनी त्याच्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला साहित्य पुरविले. आरुष हा सर्व प्रकारची चित्रे काढत असला तरी त्याच्या चित्रांमध्ये प्राण्यांच्या चित्रांचे प्रमाण जास्त आहे.  प्राजक्ता यांनी आरुषने काढलेली सर्व चित्रे जतन केली. आरुषचे आजोबा रवींद्र सातपुते हे कलेचे शिक्षक आहेत. त्यांनी आरुषची  चित्रे पाहिल्यानंतर त्यांचे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला. आरुषच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन अहमदनगरमध्ये भरवण्यात आले. त्यानंतर उदगीर येथील बाल कुमार साहित्य संमेलनातही प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन भरविण्यामागची कल्पना उलगडून सांगताना रवींद्र सातपुते म्हणाले, मुले ही कलेतून व्यक्त होत असतात. अनेक पालक मुलांच्या कलेला प्रोत्साहन देत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये जागृती व्हावी, त्यांनी त्यांच्या पाल्याला त्याची आवड जोपासण्याची मुभा द्यावी या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्राजक्ता गिरमकर म्हणाल्या, आरुषला त्याला हवी ती चित्रे आम्ही मुक्तपणे काढू दिली. त्याने ठराविक चित्रे काढावीत असा आग्रह कधीही आम्ही धरला नाही. त्यामुळे आरुष त्याला हवी तशी चित्रे काढू लागला. त्याच्या वयाप्रमाणे त्याची समज आणि चित्रे बदलत गेली. हे प्रदर्शन सोमवारी (दि.२६) देखील असणार आहे. 

टॅग्स :Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरAhmednagarअहमदनगरPuneपुणे