शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

तब्बल दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर पुणेकरांना दिसले सूर्यग्रहण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 15:58 IST

ढगाळ वातावरणामुळे पुणेकर होते दीड तास 'वेट अँड वॉच'वर

ठळक मुद्देबालगंधर्व पुलावर सकाळपासूनच सर्व नागरिकांनी केली होती गर्दी

पुणे: शहरात गेली दोन दिवस ढगाळ वातावरण दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी ८ ते ११.३० या कालावधीत भारतात काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण तर इतर भागात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार होते. नागरिकांना ढगाळ वातावरण असूनही दीड तासाच्या प्रतिक्षेने सकाळी ९.२७ वाजता सूर्यग्रहण पाहायला मिळाले. नागरिकांनी जल्लोषात सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. बालगंधर्व पुलावर सकाळपासूनच सर्व नागरिकांनी गर्दी केली होती. यानिमित्त नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशनतर्फे सूर्यग्रहणासोबत चहापान आयोजित करण्यात आले होते. फाऊंडेशनच्या आयोजकांनी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य अशी खंडग्रास सुर्यग्रहणाची प्रतिकृती तयार केली होती. ढगाळ वातावरणात नागरिक सूर्य दिसण्याची वाट पाहत होते. पण आयोजकांनी पुढाकार घेऊन या प्रतिकृतीतून खंडग्रास सूर्यग्रहण दाखवले. नागरिकांना याबद्दल माहिती देत होते. सकाळी ८ वाजल्यापासून पुलावर नागरिक येऊ लागले. मात्र ढगाळ वातावरणाने सर्वांना सुर्यग्रहणाच्या आशेत ठेवले होते. त्यावेळी एका बाजूने नवनिर्मिती फाऊंडेशन प्रतिकृतीतून सूर्यग्रहण दाखवत होते. तर लहान मुले सूर्य दिसण्याची वाट पाहत होते. अनेकांनी हे पाहण्यासाठी चष्मेही घेऊन ठेवले. आशेवर असणाऱ्या नागरिकांना दीड तासाने सूर्यदर्शन झाले. खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. ९.२७ वाजता सूर्यग्रहण दिसले. त्यानंतर ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या सूर्याच्या आकारात सूर्यग्रहण दिसत होते. ...................................................................फाऊंडेशनच्या वतीने पालकनीती आणि शैक्षणिक संदर्भ अशी पुस्तके सूर्यसंदेश देणारी कागदी प्रतिकृती नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आली होती. साधना कुलकर्णी म्हणाल्या, पालकनीती या मासिकात सूर्यग्रहणाच्या माहितीबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर लेख देण्यात आले आहेत. शैक्षणिक संदभार्तून पशू, पक्षी आणि निसर्ग अशा विषयावर लेख देण्यात आले आहेत. ..........* सूर्यग्रहणाच्या वेळी परंपरागत अंधश्रद्धेवर मुलांची मते.

* सूर्यग्रहण बघून आल्यावर डोक्यावरून अंघोळ करावी. असे घरातील ज्येष्ठ लोक सांगत असतात. परंतु, सूर्यग्रहणात चंद्रामुळे सूर्याची सावली पृथ्वीवर पडते. त्याचा अंघोळीशी काही संबंध नाही.- आर्या श्रीश्रीमाळ 

..................

* सूर्यग्रहणात पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात. ग्रहण बघून झाल्यावर काही खाऊ नये अशी अंधश्रद्धा आहे. पण आम्ही यावर विश्वास ठेवत नाही. शाळेत सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याबद्दल शिकवताना असे काही सांगितले जात नाही. - अथर्व पाटोळे 

टॅग्स :Puneपुणेsurya grahanसूर्यग्रहण