शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रानगव्यानंतर पुणेकरांना आता सुंदर हरणांचे दर्शन ! शिवणे येथील सोसायटीत भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:12 IST

महिनाभरातच पुण्यात रानगव्यांनी दोनदा दर्शन दिल्याची घटना पाणी असतानाच मंगळवारी हरणांचे कळप धडकले..

ठळक मुद्देहरणांच्या दर्शनाने सुखावले ; अन्न खायला देऊ नये, वन विभागाचे आवाहन 

पुणे (वारजे): गेल्या महिनाभरात दोन गव्यानी कोथरूड व पाषाण भागात दर्शन दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिवणे व उत्तमनगर भागात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) तुटलेल्या सीमाभिंतीतून हरणांचं कळप बाहेर लोकवस्तीत आला. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. शिवणेतील इंगळे कॉलनी येथील 'आशिर्वाद टेरेस' या सोसायटीला लागूनच एनडीए ची सीमाभिंत आहे. या भिंतीच्या मध्ये बुजवलेला ओढा (कॅनॉल) आहे. ही भिंत अनेक ठिकाणी जीर्ण झाली असून, काही ठिकाणी मोठी फट पडली आहे.  एनडीए प्रशासनाने ही फट झाकण्यासाठी काही ठिकाणी पत्रे लावले आहेत. पण त्यातूनही ये-जा करता येते. त्यामुळे या सोसायटीत अनेकदा एखादे हरीण किंवा त्यांचे कळप बाहेर येताना अनेकदा निदर्शनास आले आहेत.  सोमवारी देखील संध्याकाळच्या सुमारास  असेच एक हरणांचे कळप बाहेर येऊन भटकंती करीत असल्याचे दिसून आले. हा प्रकार वरचेवर होत असल्याने त्यांनी संजय दोडके यांच्या माध्यमातून वन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (ता २९) वन कर्मचाऱ्यांनी याठिकाणी  भेट देऊन पाहणी केली.  आम्ही दोन कर्मचारी पाठवून या ठिकाणी पाहणी केली आहे. या तुटलेल्या भिंतीतून हरण बाहेर येत असल्याचे स्पष्ट होत आहे. एनडीए प्रशासनाला त्याबाबत कळविले असून  त्यांना लेखी पत्राद्वारे हे काम प्राधान्याने करून घेण्याची विनंती करणार आहे. - दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग हरीण अधून मधून दर्शन देत असतात. पण सोमवारी हा कळप मुख्य रस्त्याच्या दिशेने जात असल्याचे दिसल्यावर त्यांना परत आतमध्ये हुसकावले. हा कळप जर रस्त्यावर गेला तर वाहनाच्या धडक बसून , किंवा भटके कुत्रेच्या हल्ल्यात त्यांच्या जिवीतला धोका होऊ शकतो. सीमाभिंत तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. यामुळे एनडीए ची देखील सुरक्षितता धोक्यात येत आहे.- अमेय गहीने, रहिवाशी,आशिर्वाद टेरेस, शिवणे 

 

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीforest departmentवनविभाग