शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांनंतर मुलाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:22 IST

 तो केवळ आठ वर्षांचा असून, रुग्णालयात उपचार घेत आहे; परंतु त्याला आता या जगात एकट्यालाच जगावे लागणार आहे. कारण, त्याच्या आईवडिलांसोबतच भावाचाही मृत्यू झाल्याने तो आता एकाकी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

कर्वेनगर - तो केवळ आठ वर्षांचा असून, रुग्णालयात उपचार घेत आहे; परंतु त्याला आता या जगात एकट्यालाच जगावे लागणार आहे. कारण, त्याच्या आईवडिलांसोबतच भावाचाही मृत्यू झाल्याने तो आता एकाकी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ारजे माळवाडीजवळील न्यू अहिरेगाव परिसरात गुरुवारी (दि.१२) गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील चौघेही जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आईवडिल व एका मुलाचा मृत्यू झाला असून, एका मुलावर अद्याप उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, बिंद्रादेवी कनोजिया या गुरुवार (दि.१२) रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठल्या. घरातील वीज चालू करण्यासाठी दोन वायर जोडण्याचा प्रयत्न करत असताना, उडालेल्या विजेच्या ठिणग्यांनी घरात आगीचा भडका उडाला. यामध्ये बिंद्रादेवी यांच्यासह घरात झोपलेले पती रामलाल आणि मुले सत्यम, साहिल गंभीररीत्या भाजले.जोराचा आवाज झाल्याने नागरिकांनी तिकडे धाव घेतली असता, घराचा दरवाजा लांब उडून पडलेला आणि घरात आग लागलेली आढळली. या वेळी नागरिकांनी लगेचच पाणी टाकून आग विझवत, चौघां जखमींना उपचारासाठी ससून मध्ये हलवले. बिंद्रादेवी कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि जखमी रामलाल कनोजिया (वय ४४) यांचा शनिवारी (दि. १४) उपचारादरम्यान मृत्यूझाला. तर रविवारी रात्री साहिल रामलाल कनोजिया (वय६) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील सत्यम रामलाल कनोजिया (वय ८) हाच रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आलेली आहे.घराला नव्हती खिडकीरात्री झोपताना गॅसचा रेग्युलेटर बंद करण्यास हे विसरले असावेत किंवा लिकेज झालेला गॅस घरात साठून, त्याचा आगीशी संपर्क येताच आगीचा भडका उडाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कुटुंब राहत असलेल्या खोलीला एकही खिडकी नव्हती, त्यामुळे त्यात गॅस अडून राहिला असेल अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. रामलाल हे रंगकाम करत असल्याची माहिती मिळाली असून, ते या भाड्याच्या घरात काही महिन्यांपूर्वी राहण्यास आल्याचे समजते.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या