शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

समांतर पुलानंतरही होणार कोंडीच!

By admin | Updated: May 22, 2016 00:38 IST

दापोडी, बोपोडी आणि खडकी भागात वारंवार होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला समांतार दोन पुलांची निर्मिती केली जाणार आहे.

पिंपरी : दापोडी, बोपोडी आणि खडकी भागात वारंवार होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला समांतार दोन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. हे पूल झाल्यानंतरही बोपोडी आणि खडकीतील मार्गावरील अरुंद रस्त्यांमुळे कोंडी कायम राहणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमीच असल्याने नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे हॅरिस पुलास समांतर दोन पूल बांधण्यात येणार आहेत. नुकतेच या कामाचे भूमिपूजन झाले. येथे ब्रिटिशकालीन हॅरिस पूल आहे. तर, १९८३मध्ये त्याच्या शेजारी दुसरा पूल बांधण्यात आला. या दोन्ही पुलांवरून एकेरी वाहतूक सुरू असून, प्रत्येकी दोन लेन आहेत. यामुळे मात्र पिंपरी-चिंचवड शहराचा ग्रेड सेपरेटरमधील आठपदरी रस्त्यांमुळे हा पूल अपुरा पडत आहे. वाढलेली वाहनांची संख्या आणि रहदारीचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. शहरातून वेगात आलेल्या शेकडो वाहनांना दापोडीतील हॅरिस पुलावर ब्रेक लागतो. सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंतच्या वर्दळीच्या काळात किमान अर्धा तास कोंडीत वाहन अडकून पडते. वाहनांच्या रांगा फुगेवाडी, मरीआई गेट पोलीस चौकी आणि खडकी बाजार असे लांबपर्यंत रांगा लागतात. कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. (प्रतिनिधी)> पुणे महापालिकेचे ढिसाळ नियोजनपुणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे बोपोडीतील जुन्या पुणे- मुंबई महामार्ग रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतून सुमारे सव्वा किलोमीटरचा रस्ता जातो. या मार्गाच्या ८० मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर करून दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, बाधित घरांना नोटीस दिली गेली आहे. या संदर्भात न्यायालयात वाद सुरू आहे. महापालिका या संदर्भात ठोस भूमिका घेत नसल्याने रुंदीकरणाचा प्रश्न रेंगाळला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अरुंद रस्त्यास दुभाजक नसल्याने काही वाहने सर्रासपणे वळण घेतात. यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. हॅरिस पुलाच्या शेजारी काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, चौकातील पलंगे चाळीतील घरे रस्त्यावरच येत आहेत. या अडथळ्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. येथील रहिवाशांशी महापालिकेची चर्चा सुरू आहे. या संदर्भात नगरसेविका अर्चना कांबळे यांनी सांगितले, ‘‘बोपोडी सिग्नल चौकातील पलंगे चाळीतील रहिवाशांनी आहे येथेच घरे देण्याचा आग्रह धरून बसले आहेत. यावर तोडगा काढून रस्ता प्रशस्त केला जाणार आहे.’’> पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या संयुक्तपणे हॅरिस पुलाला समांतर दोन पूल उभारण्यात येणार आहेत. पुण्याने १२ कोटी रुपये दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने न सांगता परस्पर भूमिपूजन कार्यक्रम उरकला. आदल्या दिवशी आम्हाला पत्रिका दिली. पुलाचे काम दोन्ही महापालिका करणार आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवडने वेगळा कार्यक्रम घेणे योग्य नाही. पुणे महापालिकेतर्फे आम्ही स्वतंत्र उद्घाटनाचा कार्यक्रम घेणार आहोत, असे नगरसेविका अर्चना कांबळे यांनी सांगितले. > हॅरिस पुलास दोन समांतर पुलांच्या कामाचा खर्च २२ कोटी ४६ लाख ३२ हजार ८८२ रुपये आहे. कामाची मुदत २ वर्षे आहे. पुलाची जोड रस्त्यासह लांबी ४१० मीटर आहे. प्रत्येक बाजूस वाहतूक मार्ग ७.५ मीटर आहे. पदपथ १.८ मीटर लांबीचा आहे.