शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांनंतर १९ गावांचे पाणी केले सुरू, आश्वासनानंतर भामाआसखेडचे आंदोलक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:06 IST

भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीमध्ये रोजगार व प्रकल्पबाधित २३ गावांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असाल तरच एमआयडीसीसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू करू, असा अल्टिमेटम धरणग्रस्तांनी दिला होता. मात्र

पाईट - भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीमध्ये रोजगार व प्रकल्पबाधित २३ गावांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असाल तरच एमआयडीसीसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू करू, असा अल्टिमेटम धरणग्रस्तांनी दिला होता. मात्र याबाबत पाटबंधारेच्या अधिकाºयांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलकांनी थोडी नरमाईची भूमिका घेत बुधवारी चाकण म्हाळुंगे औद्योगिक क्षेत्र व १९ गावांचा पाणीपुरवठा सुरू केला.या वेळी पाणीपुरवठा विभागाचे जयदीप अग्निहोत्री, बळवंत डांगले, चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, रोहिदास गडदे, स्वप्निल येवले, अनिल देशमुख व भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकºयांनी पुनर्वसनाबरोबरच औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना नोकºया व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई भासू नये, यासाठी धरणाच्या दोन्ही बाजूच्या गावांना पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागण्या करीत म्हाळुंगे व चाकण औद्योगिक क्षेत्र व १९ गावांचा पाणीपुरवठा बंद केला होता. गेले चार दिवस आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. गेली ३५ वर्षे आम्ही आमच्या मागण्यांसाठी धडपड करीत असून शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अजूनही शासन आमचा छळ करीत आहे.भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकºयांचे नोकरी व पाणीपुरवठा या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी प्रशासन, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी, प्रकल्पबाधित शेतकरी यांची सोमवारी (दि. ९) बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.या वेळी करंजविहीरे येथे पाण्याच्या टंचाईच्या त्रासाला वैतागलेल्या महिलांनी पंपहाऊसचा अगोदरच ताबा घेतला होता. परंतु प्रकल्पबाधित शेतकरी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यात समझोता झाल्याने पुढील अनर्थ टळला.-प्रत्येक प्रकल्पबाधित शेतकºयाच्या कुटुंबातील शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीत कायमस्वरूपी काम मिळावे व बुडीत क्षेत्रातील प्रत्येक गावाला २३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे इत्यादी मागण्यांना संमती दिली असल्याने आज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे