शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी सरसावले

By admin | Updated: October 21, 2014 05:11 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर शहरामध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याचा साक्षात्कार लोकप्रतिनिधींना सर्वसाधारण सभेत झाला.

पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर शहरामध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याचा साक्षात्कार लोकप्रतिनिधींना सर्वसाधारण सभेत झाला. प्रशासनाकडून उपाययोजनाच करण्यात येत नाहीत. प्रशासन हलगर्जीपणे काम करत आहे, असा आरोप करीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुख्यसभेत थैमान घातले. तसेच साथ आटोक्यात आणण्यासाठी आणखी प्रभावी उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणीही या वेळी नगरसेवकांनी केली. गेल्या सहा महिन्यांत सुमारे ३ हजार रुग्ण आढळलेले असून, सहा जणांचा मृत्यू झालेला आहे.विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहामध्ये डेंग्यू नियंत्रणात आणण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत. औषध फवारणी करण्यासाठी औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे सांगितले. तर महापालिका प्रशासनाकडे औषध फवारणीसाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. औषधाचे प्रमाण किती असावे, याबाबत प्रशिक्षण देण्यात येत नाही. रुग्णांची संख्या जास्त आहे, खासगी रुग्णालयामधून नागरिक उपचार घेत आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्लेट-लेट तपासणी करण्याची यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांना लॅबमध्ये जाऊन तपासणी करावी लागत असल्याचे रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनासुद्धा आरोग्य विभागाकडे वर्ग केले पाहिजे. साठवलेले स्वच्छ पाणी ओतून द्या, तरच डेंग्यूवर नियंत्रण आणता येईल, असे उपमहापौर आबा बागूल यांनी या वेळी बोलताना सांगितले. तसेच पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यात येत नाही. याठिकाणी तपासणीची यंत्रणा नाही. प्रशासन संपूर्णपणे डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी अपयशी ठरले आहे. धूर फवारणीसाठी मशिन नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याची उत्तरे प्रशासनाकडून देण्यात येत असल्याचा आरोप या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आला. (प्रतिनिधी)