शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

२७ तासानंतर शिरुरमधील तरुणाचा मृतदेह शोधण्यात पाणबुडीच्या पथकाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 15:50 IST

भिगवण-राशीन रोडवरील पुलावरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह २७ तासा नंतर शोधण्यात पाणबुडीच्या पथकाला यश मिळाले. त्यामुळे २७ तास चाललेल्या शोध कार्याला विराम मिळाला.

ठळक मुद्देज्या ठिकाणी नितीन पडला होता, त्याठिकाणी पाणी खोल असल्यामुळे पथकाला मिळत नव्हते यश सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी घटनास्थळी भेट देण्यास न आल्याने नागरिकांत रोष

भिगवण : भिगवण-राशीन रोडवरील पुलावरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह २७ तासा नंतर शोधण्यात पाणबुडीच्या पथकाला यश मिळाले. त्यामुळे २७ तास चाललेल्या शोध कार्याला आणि नातेवाईकांच्या आपला माणूस पाहण्याच्या प्रक्रियेला विराम मिळाल्याचे याठिकाणी दिसून येत होते.नितीन बबन भिसे (वय २१, रा. मलठण) हा ऊसतोड करणारा तरुण शुक्रवारी आपल्या आई-वडिलांना आणि मंडळीला भेटून गावाकडून कराड येथील साखर कारखान्यावर निघाला होता. भिगवण राशीन पुलावर आला असताना दुचाकीचा पुढील टायर फुटल्याने अपघात होवून लोखंडी खांबावर आदळून पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी नितीन पडला होता, त्याठिकाणी पाणी बरेच खोल असल्यामुळे भिगवण पोलिसांनी राबविलेल्या शोध पथकाला यश मिळत नव्हते. २४ तास उलटल्यानंतर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी महाराष्ट्र अंडर वोटर सर्विसेस या पाणबुडी पथकाला पाचारण करीत घटनास्थळी थांबून राहत मदत कार्यात सहभाग घेतला. या पथकाचे मुख्य विजय दशरथ शिवतारे, नितीन काळंगे, किशोर काळंगे, स्वप्नील जराड यांच्या तीन तास चाललेल्या शोध कार्यामुळे अखेर नितीनचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे २७ तास चाललेल्या शोधकार्याला अखेर विराम मिळाला. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांनी परिस्थितीवर लक्ष देत वाहतूक व्यवस्थाही चालू ठेवली होती. नितीनच्या घरच्यांनी घटनास्थळी पूर्ण रात्र जागून काढीत मृतदेह वर येण्याची वाट पाहिली. नागरिकांनी या वेळी गर्दी केली होती.घटना घडल्यापासून घटनास्थळी लक्ष देत तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मृतदेह सापडल्यावर महाराष्ट्र अंडर वोटर सर्विसेस पाणबुडी पथकाचे विजय शिवतारे आणि पूर्ण टीमचे आभार मानले.घटना ज्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी घटनास्थळाला भेट द्यायला सुद्धा आले नसल्यामुळे नागरिकांत या खात्याबाबत रोष दिसून आला.

टॅग्स :Puneपुणे