शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार करून पुण्यात चिमुकलीचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 06:27 IST

पुणे : घरात आई-वडिलांशेजारी झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार आणि निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना धायरी भागात घडली.

पुणे : घरात आई-वडिलांशेजारी झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार आणि निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना धायरी भागात घडली. शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडलेला हा घृणास्पद प्रकार रविवारी सकाळी चिमुरडीचा मृतदेह आढळल्यानंतर उघडकीस आला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी २० ते २५ जणांची कसून चौकशी सुरू होती.श्रुती विजय शिवगणे (वय अडीच वर्षे) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव असून वडील विजय (३२, रा. लगडमळा, वडगाव धायरी) यांनी याची फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार व खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.विजय शिवगणे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोन महिन्यांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी ते पुण्यात आले होते. सध्या ते सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरीजवळ राहत होते. समृद्धी हॉटेलमध्ये ते वेटर म्हणून काम करतात, तर आई विद्या जवळच्याच मंडईमध्ये भाज्या विकतात.दिवाळीनिमित्त शनिवारी त्यांच्याकडे श्रुतीचा मामा राहण्यास आला होता. घरामधील सर्व जण झोपल्यानंतर दरवाजा उघडून घरामध्ये घुसलेल्या अज्ञात आरोपीने श्रुतीला उचलून नेले. रात्री बारा-सव्वाबाराच्या सुमारास विद्या यांना जाग आली, तेव्हा श्रुती त्यांच्याजवळ नव्हती. सर्वांनी शोधाशोध करूनही ती न सापडल्याने, पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर पहाटे साडेसहाच्या सुमारास परिसरात काही ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. पोलिसांनी शोध घेतला असता तिचे कपडे मिळाले आणि तेथून काही अंतरावरच श्रुतीचा मृतदेह आढळला. तिच्या गळ्याभोवती फासचे व्र्रण होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे, तसेच आरोपीने गळा आवळून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे विभागात हळहळ व संताप व्यक्त केला जात आहे़ आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कार