शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अ‍ॅड. गडलिंग व सेन संशयित माओवादी: जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 02:26 IST

प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी विशेष सत्र न्यायाधीश के. डी. वढणे यांच्या न्यायालयात झाली.

पुणे : बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांनी न्यायालयासमोर केलेल्या विविध अर्जांवरील आणि जामिनावरील गुरुवारी (दि. २७) सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी विशेष सत्र न्यायाधीश के. डी. वढणे यांच्या न्यायालयात झाली.पाचही आरोपींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येरवडा कारागृहात ठेवणे सोयीस्कर नाही. दुसऱ्या कारागृहात हलवावे, अशी मागणी येरवडा कारागृह प्रशासनाने केली आहे. अ‍ॅड. गडलिंग व शोमा सेन यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पोलिसांची बाजू मांडण्यासंदर्भात अर्ज सादर केला आहे. अ‍ॅड. गडलिंग यांना हवे असणाºया पुस्तकांवर उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. जामिनासाठी अर्ज दाखल करून एक महिन्याचा कालावधी होत आहे. त्यामुळे त्यावर लवकर सुनावणी घेण्यात यावी. तसेच कारागृहात कायदेविषयक पुस्तके वाचण्याकरिता मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने पुस्तके देण्यासंदर्भात आदेश दिला असतानाही मला अद्याप पुस्तके मिळाली नसल्याचे अ‍ॅड. गडलिंग यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने सांगितले, की अद्याप पुस्तके का मिळाली नाहीत, याबाबत स्वतंत्र चौकशी होईल. नवीन पुस्तकांची काही यादी असेल तर सादर करा. यापुढे न्यायालयाच्यामार्फत पुस्तके पोलिसांकडून तपासणी करून देतील.सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी गडलिंग यांचा आरोप खोडून काढत त्यांच्या वकिलास दोन पुस्तके तपासणी करून दिली होती, अशी माहिती दिली. जामिनावरील युक्तिवाद पूर्ण होण्यासाठी गडलिंग यांना पुस्तक द्या, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले. गडलिंग यांनी न्यायालयात अर्ज सादर करून आपणास कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अंर्तगत डिप्लोमा इन सायबर लॉ करावयाचा असून त्याकरिता परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित पदवीबाबत चौकशी करून कारागृह प्रशासनाने त्यांचे मत मांडावे, असे सांगितले आहे. गडलिंग न्यायालयात स्वत: केस लढत आहेत. बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. शाहिद अख्तर, अ‍ॅड. रोहन नहार व अ‍ॅड. राहुल देशमुख काम पाहत आहेत. गडलिंग आणि शोमा सेन यांचे जामीन अर्जावर तसेच संबंधित पाच जणांना दुसºया कारागृहात हलविण्याबाबत २७ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.गणेशोत्सवाचा जामिनाशी काय संबंध : गडलिंगशोमा सेन आण गडलिंग यांच्या जामीन अर्जावर गणपती विसर्जनानंतर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. पवार यांनी केली. त्यावर अ‍ॅड. गडलिंग यांनी आक्षेप घेत गणपती उत्सव आणि जामिनाचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित केला. सुनावणी २१ सप्टेंबरला ठेवण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने सर्वांच्या अर्जावर एकाच वेळी सुनावणी होण्याच्या दृष्टीने २७ सप्टेंबर ही तारीख ठेवल्याचे नमूद केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी