शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat| मावळातील ११ ग्रामपंचायतींवर होणार प्रशासकांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:49 IST

कार्यकाळ संपलेल्या ११ ग्रामपंचायतींवर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती...

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या ११ ग्रामपंचायतींवर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात साळुंब्रे, डोणे, आढले व उदेवाडी या गावांचा समावेश आहे, तर पुढील महिन्यात आंबळे, बेबेडओहोळ, शिळिंब व लोहगड या गावांवर व मे महिन्यात भाजे, मुंढावरे, संगिसे या गावांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या गावांतील ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक न झाल्याने या ठिकाणी प्रशासक लागू करण्यात आले आहेत. प्रशासक लागू झालेल्या या ग्रामपंचायतीमध्ये लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याने, या गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.

यात साळुंब्रे व डोने ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ४ जानेवारी रोजी संपला आहे. त्या ठिकाणी गट विस्तार अधिकारी एन.जे. ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आढले ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ३ जानेवारी रोजी संपला असून, त्या ठिकाणी एन.जे. ढवळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उधेवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ५ जानेवारी रोजी संपला असून, त्या ठिकाणी एस.के. खांडेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

तर आंबळे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी रोजी संपणार असून, तेथे बी.डी. वायकर हे प्रशासक असणार आहेत. शिळीब ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपणार असून, त्या ठिकाणी एन.जे. ढवळे हे प्रशासक असणार आहेत. लोहगड व बेबेडओहोळ या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपणार असून, तेथे एन.जे. ढवळे हे प्रशासक असणार आहे, तसेच भाजे, मुंढावरे व संगिसे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ २ मे रोजी संपणार असून, तेथे एस.के. खांडेकर हे प्रशासक असणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायत