पुणो : भारतीय लष्कराला मदत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रादेशिक सेनेत दाखल होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या सेनेत विविध शासकीय विभागातील उच्च पदस्थ अधिकारी, विविध क्षेत्रतील व्यावसायिकही सहभागी होवून देशाची सेवा करीत आहेत. विशेष म्हणजे, या सेनेने नुकत्याच जम्मू-काश्मिरमध्ये आलेल्या पुरामध्ये जोमाने मदतकार्य केले.
दक्षिण कमानच्या प्रादेशिक सेना मुख्यालय (टेरिटोरियल आर्मी), 1क्1 इन्फ्रन्ट्री बटालियन आणि मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीच्या भेटीदरम्यान ही माहिती समोर आली. विशेष म्हणजे, आपले काम संभाळून हे अधिकारी, विविध क्षेत्रतील व्यावसायिक लष्करात दाखल होवून अभिमान बाळगत आहेत.
या प्रादेशिक सेनेतील कॅप्टन प्रदीप आर्या हे भारतीय राजस्व सेवेत अधिकारी असून सध्या मुंबईच्या आयकर विभागात सहआयुक्त आहेत. ते 2क्क्9 मध्ये प्रादेशिक सेनेमध्ये दाखल झाले. याबाबत ते म्हणाले, मी दाखल झाल्यानंतर पॅरा फोर्समध्ये मी कार्यरत आहे. लष्करात दाखल होणो हे माङयासाठी गर्वाची गोष्ट आहे. ज्यांना देशाची सेवा करायची आहे, अशांनी या सेनेमध्ये दाखल व्हावे.
आर्या यांना पाहून त्यांचे सहकारी मणिवनन पी. सुध्दा प्रादेशिक सेनेत दाखल झाले. ते सध्या लेफ्टनंट पदावर कार्यरत आहेत. कर्नाटक राज्याच्या शहरी जल वितरण व ड्रेनेज बोर्डाचे ते संचालक आहेत.
कोल्हापूरचे मेजर पृथ्वीराज चव्हाण हे सुध्दा 2क्क्7 मध्ये प्रादेशिक सेनेत दाखल झाले. त्यांचा पॅकेजिंगचा व्यवसाय आहे.
विशेष म्हणजे, 2क्11 मध्ये प्रजासत्ताक दिवसानिमित्त झालेल्या परेडमध्ये ते रिझव्र्ह कंटिजेंट कमांडर म्हणून होते.
पुण्यातील लेफ्टनंट चिन्मय पेशे हे सॉफ्टवेअर अभियंते असून ते याचवर्षी सप्टेंबरमध्ये प्रादेशीक सेनेत दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
बचावकार्यात प्रादेशिक सेनेची मोलाची भुमिका
1 देशात येणा:या नैसर्गिक आपत्तीमध्ये बचावकार्यात लष्कराच्या जवानांसोबत खांद्याला खांदा लावून प्रादेशिक सेना मदत करीत असते. नुकत्याच जम्मू-काश्मिरमध्ये आलेला पुरात दक्षिण कमानच्या 35 कंपनीच्या 1क्क् जवानांनी मदत कार्य केले. उत्तराखंडात आलेल्या प्रलयातही या सेनेने महत्वाची भुमिका बजावली.
विविध क्षेत्रतील दिग्गज सेनेमध्ये
2 प्रादेशिक सेनेमध्ये विविध क्षेत्रतील दिग्गजांनी आपले स्थान निर्माण केले आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, नेमबाज अभिनव बिंद्रा, दक्षिणी अभिनेता मोहन लाल, माजी मंत्री सचिन पायलट आदींचा यामध्ये समावेश आहे.