शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर; आजच्या कारवाईत विभाग अन् पोलिसांचा मोठा ताफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 14:33 IST

धानोरी रस्त्यावर यासाठी अतिक्रमण विभागाचा मोठा ताफा तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

येरवडा : धानोरी येथे मंगळवारी अतिक्रमण कारवाईदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. धानोरी रस्त्यावर यासाठी अतिक्रमण विभागाचा मोठा ताफा तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आलेली  आहे. 

या मोठ्या कारवाईसाठी  अतिक्रमण विभागाच्या संपूर्ण स्टाफ सह आकाशचिन्ह परवाना व बांधकाम विभाग तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालय कडील सर्व अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. काल कारवाईदरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिका प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेत ही कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी सुमारे पंचवीस जेसीबी, दीडशे अधिकारी व कर्मचारी, 100 पोलीस यांच्यासह दंगल पथक घटनास्थळी कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार 

''निरीक्षक व चालक यांना कारवाईदरम्यान झालेल्या हल्ल्याचा काळया फिती लावून निषेध नोंदवत बुधवारी सकाळी अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. कोणत्याही विरोधाला न जुमानता महापालिका प्रशासन संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार असल्याचे यावेळी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.'' 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPoliceपोलिसMayorमहापौर