शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर; शेतकरी, डेअरी अडचणीत, दररोज ८० लाख लीटर अतिरिक्त दूधसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:11 IST

राज्यात दुधाचा खरेदी दर महाग असताना आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. यामुळे पावडर व बटर निर्मिती करणाºया अनेक कंपन्यांनी दूधाची खरेदी थांबविले आहेत़

- सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : राज्यात दुधाचा खरेदी दर महाग असताना आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. यामुळे पावडर व बटर निर्मिती करणाºया अनेक कंपन्यांनी दूधाची खरेदी थांबविले आहेत. परिणामी राज्यात दररोज तब्बल ८० लाख लिटर अतिरिक्त दूध साठा शिल्लक राहत आहे. याने दूध उत्पादक शेतकरी व सहकारी व खाजगी दूध डेअºया अडचणीत सापडल्या आहेत.सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर २६० वरून १२० पर्यंत व बटरचे दर ३४० वरुन थेट २७० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे दूध पावडर व बटरसाठी विक्री होणाºया दुधाचे दर २९ रुपयांवरून २१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. परंतु शासनाने शेतकºयांना एक लिटरसाठी किमान २७ रुपये दर निश्चित केला आहे.यामुळे सहकारी व खासगी दूध डेअºया अडचणीत आल्या आहेत. खरेदी दर महाग असताना पावडरचे दर उतरल्याने अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे.राज्यात दररोज सरासरी १ कोटी २० लाख लिटर दूध उत्पादन होते. यापैकी केवळ ४० टक्के दूध पिशवी व सुट्या स्वरुपात विक्री केली जाते. तर तब्बल ६० टक्के दूध पावडर व बटर या बायप्रोडक्टसाठी विक्री केली जाते. परंतु मागणी नसल्याने हजारो टन दूध पावडर शिल्लक पडून आहे.अनुदान, बफर स्टॉकची मागणीराज्यात साधारण आॅक्टोबर ते मार्च हा जनावरांचा पुष्टकाळ किंवा दूध उत्पादनासाठी सुकाळ मानला जातो. परंतु सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आमूल व अन्य काही खाजगी दूध डेअºयांनी अतिरिक्त दूध खरेदी थांबवली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरीदेखील अडचणी सापडला आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाप्रमाणे शेतकºयांना प्रति लीटर ५ रुपये सबसिडी द्यावी आणि उत्पादन होणारे जादा दूध शासनाने खरेदी करून बफर स्टॉक करावा, अशी मागणी राज्यातील दूध उत्पादक कृती समितीने राज्य शासनाकडे केली आहे.- विष्णू हिगे, अध्यक्ष,पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ

टॅग्स :Puneपुणे