शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

‘त्या’ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:26 IST

महापालिका प्रभाग समिती सदस्य नगरसेवकांवर शिरजोर असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फलक काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अजूनही सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत. त्यांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी - महापालिका प्रभाग समिती सदस्य नगरसेवकांवर शिरजोर असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फलक काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अजूनही सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत. त्यांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्यांची निवड मागील आठवड्यात झाली. घटनात्मकदृष्ट्या एकही अधिकार नसणारे हे पद असताना ‘स्वीकृत नगरसेवक’ अशी जंगी जाहिरातबाजी काही सदस्यांनी केली होती. आठही प्रभागांतील प्रमुख चौकांत, रस्त्यांवर, टॉवरवर त्या त्या भागातील राजकीय कार्यकर्त्यांचे ‘सौजन्य’ स्वीकारून मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी केल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकनियुक्त नगरसेवकांनाही घाम फुटला होता. राष्टÑवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या फ्लेक्सवर त्वरित कारवाई करणाऱ्या प्रशासनाने या स्वीकृत प्रभाग सदस्यांचे फ्लेक्स काढण्याबाबत जरा जास्तच उदासीनता दाखविल्याचे लोकमतने उघडकीस आणले.शुक्रवारच्या ‘हॅलो’मध्ये या विषयी वृत्त प्रकाशित करून या सदस्यांची पोलखोल केली होती. शहरवासीयांसमोर वास्तव मांडले होते. तसेच या अनधिकृत फ्लेक्सबाजीला प्रशासनाचे अभय असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हे वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासनाने सर्व प्रभागांतर्गत कारवाई सुरू केली. आकुर्डीतील संभाजी चौक, म्हाळसाकांत चौक, पिंपरीतील लिंक रस्ता चौक फ्लेक्स तातडीने काढले.दरम्यान, सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रार करूनही फ्लेक्स काढले जात नाहीत. प्रभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकाºयांचे अभय असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.विनापरवाना फ्लेक्सवर कारवाई करावी, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे सर्व प्रभागाच्या प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. यापूर्वी काही भागातील फ्लेक्स काढले असून, उर्वरित भागातही कारवाई केली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परवानगी घेऊन फ्लेक्स उभारावेत.- विजय खोराटे, सहायक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या