शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 03:59 IST

पुणे : सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक (कोटपा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची सामूहिक शपथ घेत पुणे शहर पोलिसांनी ...

पुणे : सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक (कोटपा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची सामूहिक शपथ घेत पुणे शहर पोलिसांनी शाळा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण पुणे पोलिसांना देण्यात आले.सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा (कोटपा) - २००३च्या अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा झाली. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. अंकित शहा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, संबंधचे महाराष्ट्र प्रकल्प प्रमुख दीपक छिब्बा, व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी मार्गदर्शन केले.डॉ. वेंकटेशम म्हणाले, कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणे गुन्हा आहे. लहान मुले आणि तरुणांना अशा उत्पादनाच्या संपर्कात आणणे अधिक धोकादायक आहे. या कार्यशाळेतील प्रशिक्षणामुळे शाळा-कॉलेज परिसरात तंबाखू-सिगारेटची विक्री रोखण्यास मदत होईल.सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी ५० टक्के कॅन्सर आणि ९० टक्के तोंडाचे कॅन्सर हे केवळ तंबाखू सेवनामुळे होतात. जे रुग्ण अशा जीवघेण्या आजाराच्या शस्त्रक्रियेतून जातात ते आयुष्यात निराश होऊन जीवनाचा आनंद हरवून बसतात. त्यापैकी ५० टक्के रुग्ण एक वर्षापेक्षा जास्त जगत नाहीत, असे डॉ. अंकित शहा यांनी सांगितले.महाराष्ट्रात जवळपास २.४ कोटी लोक तंबाखू उत्पादनाचा वापर करतात. आणि तंबाखूमुळे होणाºया आजारात दरवर्षी ७२ हजार लोक मरण पावतात. श्वसनरोग, क्षयरोग आणि अन्य आजरापेक्षा ही सार्वजनिक स्थळी धूम्रपान करून इतरांच्या आरोग्य धोक्यात टाकतात. महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी ५३० मुले तंबाखूच्या संपर्कात येतात.

टॅग्स :Smokingधूम्रपानPuneपुणे