शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

उरुळी कांचन पोलिसांची रोडरोमिओंवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:37 IST

देसाई महाविद्यालय : दंडात्मक मोहिम

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या परिसरात; तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेर उभे राहून विद्यार्थिनींची छेड काढणे, घोळका करून गोंधळ घालणे, अन्य विद्यार्थ्यांना दमदाटी करून मारहाण करणे, विनापरवाना दुचाकी चालवणे, दुचाकीवर तिघांनी बसून गोंधळ घालत मोठ्या आवाजात दुचाकी चालवत, वाहतुकीला अडथळा निर्माण करीत वाहने उभी करून अथवा रस्त्यात दुचाकी वाहने लावून त्यावर बसून विक्षिप्त अंगविक्षेप करणे अशासारखी समाजविघातक कृत्ये करून शांतता भंग करणाऱ्या रोडरोमिओंवर बुधवारी, दि. ९ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली.

या गोष्टींना आळा घालण्यासाठी येथील पोलिसांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र, गाडीचे लायसन्स नसलेल्या विद्यार्थ्यांना; तसेच परिसरात अनधिकृतरीत्या फिरणाºया तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर समज म्हणून दंडात्मक कारवाई करीत यापुढे कडक फौजदारी कारवाईचे संकेत दिले. पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस नाईक सोमनाथ चितारे, पोलीस हवालदार अमोल भोसले, पोलीस नाईक सचिन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. महाविद्यालयामध्ये प्रवेश नसूनही परिसरात आणि गेटवर उभे राहून टवाळक्या करणाºया रोडरोमिओंवर प्राधान्याने ही कारवाई करण्यात आली. ज्याच्याकडे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना बोलावून त्यांना ताकीद देण्यात येणार आहे; तसेच इतर शांतता भंग करणाºया युवकांवर फौजदारी कायद्यांतर्गत कारवाई केलीजाणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे