शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

रोडरोमियोंवर ‘निर्भया’द्वारे कारवाई

By admin | Updated: April 1, 2017 02:03 IST

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यातील पाच जिल्ह्यांत निर्भया पथकाची स्थापना सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे.

कामशेत : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यातील पाच जिल्ह्यांत निर्भया पथकाची स्थापना सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून अनेक रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. या पथकात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी येथे झालेल्या परिसंवादात सांगितले.येथील एका रिसोर्टमध्ये शुक्रवारी दुपारी नागरिक व पोलीस यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलीस महासंचालक नांगरे पाटील, डीवायएसपी शिवतारे, एसीपी राजकुमार शिंदे, कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.कामशेत पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी आलेल्या नांगरे पाटील यांनी या परिसंवादाच्या माध्यमातून नागरिक व महिला व विद्यार्थिनींचे प्रश्न जाणून घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित नेहरू विद्यालयाच्या विद्यार्धीनिनी स्वागत गीत सादर केले. नंतर नांगरे पाटील यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत महिला व मुलींना कोणी त्रास देत आहे का या प्रश्नाने सुरुवात केली. अनेक विद्यालयीन विद्यार्धीनिनी प्रश्न विचारले. आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर मुलीनी सोशल मिडीयाचा वापर अतिशय सावधानतेने करावयाला हवा, अशा सल्ला यावेळी नांगरे पाटील यांनी विद्याथीर्नीना दिला.कामशेत शहरातील वाहतूक कोंडीचा ऐरणीचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत व पोलीस यांची मिटिंग बोलून शहरातील वाढलेली अतिक्रमणे एक महिन्याच्या आत काढण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. जुना मुंबई -पुणे महामार्गावर व द्रुतगती मार्गावर ठराविक ठिकाणी होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी च्या उपाय योजना यावर नागरिकांनी प्रश्न मांडले.या कार्यक्रमाला कामशेतच्या सरपंच सारिका रमेश शिंदे, सदस्या सारिका घोलप, रुपाली शिनगारे, पोलीस पाटील सविता वरघडे, पुणे जिल्हा महिला दक्षता समिती सदस्या कल्पना कांबळे, लायन क्लब महेश शेट्टी, सुनील भटेवरा, पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य एस. डी. घुले, खांडशी सरपंच बाळासाहेब शिरसट, ताजे सरपंच रामदास केदारी, व्हीआयटीचे निलेश गारगोटे, कैलास गायकवाड, तुकाराम शेंडगे, चंद्रकांत राउत, महादू लगड, विठ्ठल शेंडगे, डॉ. विकेश मुथा, गणेश भोकरे, माजी सरपंच विजय शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. (वार्ताहर)पोलिसांकडून त्रास : सोने, चांदी व्यापाऱ्याची तक्रारसोने चांदीच्या व्यापाऱ्यांना पोलिसांचा त्रास होत असल्याची एका व्यापाऱ्याने तक्रार केली. चोरीचा माल तुम्ही विकत घेतला का? असा प्रश्न विचारून पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले जाते. यामुळे आमच्या व्यवसायावर निष्कारण परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तरुणांनीही प्रश्न विचारले. शहरातील शाळांच्या परिसरात शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी अनेक दुचाकीस्वार शाळेच्या घिरट्या मारतात. एका वजनदार दुचाकीच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे आवाज काढले जातात, अशा तक्रारी केल्या. त्यांच्यावर लवकरच कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पाटील यांना देण्यात आले.