शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:26 IST

३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई : ७ हजार रुपयांचा दंड वसूल

नारायणगाव : येथील शहरातील पुणे - नाशिक महामार्ग, मुख्य बाजारपेठ, जुन्नर रस्ता व खोडद रोडवर बेशिस्त पार्किंग करणाºया ३५ वाहनांवर कारवाई करून ७ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे , अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली नारायणगाव पोलिसांनी वाहतूक संदर्भ पोलिसांनी बैठक घेऊन बेशिस्त वाहतूक करणाºया वाहनचालकांवर कारवाई चा इशारा दिला होता.

रस्त्यांवर विविध वस्तू, फळे विक्री करणारे गाळा धारक, हातगाडी वाले, खाजगी प्रवाशी वाहतूक करणाºया जीप, रिक्षा, टेम्पो आदींनी वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये अशी सूचना केली होती. तसेच सूचनांचे पालन न करणाºयावर खटले भरले जातील असा इशारा दिला होता. त्यानुसार खोडद रोडवर १२ वाहने पुणे नाशिक महामार्गावर १२ व जुन्नर रोडवर ११ जणांवर कारवाई केली. तसेच पासून सरपंच बाबू पाटे व त्यांच्या सहकाºयांनी गावातून प्रभात फेरी काढून बेशिस्त वाहने बाजूला करावीत असे आवाहन केले. त्यानंतर अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, राहुल गोंधे, पोलीस वाहतूक नियंत्रक शामसुंदर जायभाये, सचिन कोबल, होमगार्ड गणेश बेल्हेकर यांनी जॅमर लावून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. तसेच पोलीस जीप मध्ये माईकद्वारे सूचना देण्यात आली, या सूचनेचे पालन न करणारयांवर खटले दाखल करण्यास सुरुवात केली .

या कारवाईत पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम एस तलवार, हवालदार संदीप देवकर, एस जी शिंदे व ट्रॅफिक वार्डन यांनी भाग घेतला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी स्टेशन, लोणी काळभोर फाटा, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन या ठिकाणी महामार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग करणाºया वाहनांवर आगामी काळात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.१२ कारला जॅमर, २४00 रुपयांचा दंड वसूललोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाºया १२ कारवर दंडात्मक कारवाई करुन २४00 रुपये दंड वसूल केला. पुणे-सोलापूर महामार्गावर अस्ताव्यस्त कार पार्किंग केले जाते. या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होतो. तसेच त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी अशा अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या कारवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे संबंधितांनी वाहने पार्क करताना व्यवस्थित पार्क करावीत. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस