शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामांवर कारवाई

By admin | Updated: March 31, 2017 02:50 IST

गेल्या काही वर्षांपासूनचा अवैध बांधकामांचा अधांतरी आणि तारांकित प्रश्न अद्याप काही सुटलेला नाही शहरातील सुमारे

वाकड : गेल्या काही वर्षांपासूनचा अवैध बांधकामांचा अधांतरी आणि तारांकित प्रश्न अद्याप काही सुटलेला नाही शहरातील सुमारे लाखाच्या वर अवैध बांधकामांवर आजही टांगती तलवार असतानाच गेल्या दोन महिन्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महापालिका अधिकारी कामात व्यस्त आणि नागरिकांचे बांधकाम मस्त अशा स्वरूपात राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयावर जिकडे तिकडे अवैध बांधकामांना मोठे पेव फुटल्याचे चित्र होते. याच धर्तीवर महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने थेरगावातील गणेशनगर परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तात ११ बांधकामांवर हातोडा फिरविला आहे. निवडणुकानंतरची ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. सकाळी ११च्या सुमारास एकता कॉलनी परिसरातून कारवाईला सुरुवात झाली. तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टर, तीन ट्रक आणि १५ मजुरांच्या साहाय्याने १०८१ स्क्वेअर मीटरची ११ बांधकामे पाडण्यात आली. सकाळी ११ च्या सुमारास एकता कॉलनीतील कुंजीर यांच्या बांधकामावर हातोडा फिरला. कारवाई सुरु होताच परिसरातील रहिवाशांनी रस्त्यांवर एकच गर्दी केली होती. यातील सर्वांना महापालिकेने नोटीस बजावली होती. कारवाईचा शेवट लोकमान्य कॉलनीतील सुंदर सरोदे यांच्या बांधकामावर करण्यात आला. सरोदे यांच्या दोन्ही स्लॅपला ब्रेकरच्या साहाय्याने मोठे होल पाडण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेचे २४ आणि वाकड ठाण्यातील २८ पोलिसांचा ताफा तैनात होता. कारवाई दरम्यान माजी नगरसेवक अ‍ॅड सचिन भोसले, संतोष बारणे यांनी घटनास्थळी भेट देऊन बांधकामे न पाडता अधिकाऱ्यांना थोडा वेळ द्यावा, नागरिकांना बाजू मांडण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंती करण्याचा प्रयत्न केला असता आमच्याकडे तक्रारी आल्या असून आम्ही यांना नोटीस बजाविली होती, असे सांगण्यात आले. ही कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(वार्ताहर)आरोप : चेहरे पाहून कारवाई महापालिकेचे अधिकारी चेहरे पाहून कारवाई करीत आहेत, हे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद करावे. कोणालाही नोटीस न देता थेट बांधकामे पाडली जातात. हे अप्रशासकीय आहे. लोकांना त्यांची बाजू मांडण्यास संधी द्यावी अन् न्यायालयाने सांगितले की बांधकाम अनियमित आहे, तर निश्चित कारवाई करावी. मात्र विनाकल्पना आणि चेहरे पाहून कारवाई कारवाई थांबवावी. आम्ही कुठल्याही परिस्थितीत जनतेसोबत आहोत. हा प्रश्न मी सभागृहात उपस्थित करणार आहे.- अ‍ॅड सचिन भोसले (नगरसेवक)