शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

वाळूसम्राटांवर धडक कारवाई

By admin | Updated: June 17, 2016 05:03 IST

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करून वाळू चोरून नेणारे पाच ट्रक व त्यामधील पंचवीस ब्रास वाळू, असा ७६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज गेल्या दोन

इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करून वाळू चोरून नेणारे पाच ट्रक व त्यामधील पंचवीस ब्रास वाळू, असा ७६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज गेल्या दोन दिवसांत इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पाच वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतोष बापू आढाव (वय २०, रा. डाळज नं. १, इंदापूर), राहुल राजेंद्र उमाप (वय २०, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे), धनाजी हणमंत लांडगे (वय ३०, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), सोमनाथ भारत सोलणकर (वय २०, चंदनवाडी, ता. दौंड, जि. पुणे), रियाज उस्मान पठाण (रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड विधान ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीची वाळू आणि पंचाहत्तर लाख किमतीचे ट्रक, असा पोलिसांनी जप्त केलेल्या मालाचा तपशील आहे.इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्यासह राहुल दत्तात्रय बडे, अर्जुन बाळासाहेब मानसिंग आदींसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दि. १४ व १५ जून दरम्यान ही कारवाई केली आहे. संतोष आढाव या ट्रकचालकास (एमएच १२ एफझेड ३८९२) वाळू चोरून घेऊन जाताना इंदापूर शहरातील डॉ. कदम यांच्या हॉस्पिटलजवळ पकडण्यात आले. राहुल उमाप या वाहनचालकास ट्रक (एमएच १२ एमव्ही १७२८) मधून वाळू चोरून घेऊन जाताना इंदापूर शहरातील बाबाचौकात पकडले. धनाजी लांडगे या चालकास ट्रक (एमएच १२ जेझेड ७१७१) मधून वाळू चोरून घेऊन जाताना इंदापूर शहरातील डॉ. पाणबुडे यांच्या दवाखान्याजवळ पकडले. सोमनाथ सोलनकर या वाहनचालकास ट्रक (एमएच १२ एचडी ३५१४) मधून वाळू चोरून घेऊन जाताना शिरसोडी गावच्या हद्दीत पकडले. रियाज पठाण या वाहनचालकास ट्रक (एमएच १२ एचडी ५११४) मधून वाळू चोरून घेऊन जाताना माळवाडी गावातील पेट्रोल पंपासमोर पकडले.