शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह बांधकामास विलंबप्रकरणी कारवाई- कुलगुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:04 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरू होण्यास दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला. याप्रकरणी झालेल्या दिरंगाईच्या चौकशीची कारवाई केली जाईल, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरू होण्यास दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला. याप्रकरणी झालेल्या दिरंगाईच्या चौकशीची कारवाई केली जाईल, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. यावेळी सिनेट सदस्यांनी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता वसतिगृहांची संख्या वाढविण्याची मागणी केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलींचे नवीन वसतिगृह बांधण्यासाठी विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाने १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान दिले होते. त्या निधीतून नवीन इमारतीच्या बांधकामाची वर्कआॅर्डर काढून फेब्रुवारी २०१७ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र ज्या जागेवर वसतिगृह बांधायचे आहे, तेथील जुने बांधकाम पाडून काम सुरू करण्यासाठी मोठा विलंब लावला. प्रशासनाकडून झालेल्या या दिरंगाईच्याविरोधात सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर सामाजिक संकुलाचे बांधकाम खूप धीम्म्या गतीने सुरू आहे, याविरोधात अभिषेक बोके यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. दोन्ही प्रस्ताव एकाच वेळी चर्चेला घेण्यात आले.मुलींना विद्यापीठात प्रवेश मिळूनही वसतिगृह न मिळाल्यामुळे त्यांना प्रवेश रद्द करून घरी जावे लागले आहे. त्यामुळे मुलींचे वसतिगृह हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे यासाठी विलंब का झाला, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शशिकांत तिकोटे यांनी केली. संतोष ढोरे यांनी सांगितले, की सामाजिक शास्त्र संकुलाच्या बांधकामास विलंब झाल्याप्रकरणी केवळ महिना ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड ठेकेदारांच्या दृष्टीने अत्यंत किरकोळ आहे, त्यांना यामुळे काहीही फरक पडणार नाही. मात्र विद्यापीठाचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे.प्रश्न नाकारल्याचे सांगताच स्थगन प्रस्ताव मांडू दिलासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट बैठकीसाठी सदस्यांनी विचारलेले अनेक प्रश्न व काही स्थगन प्रस्ताव वगळण्यात आले. सिनेट सदस्य शशिकांत तिकोटे यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्यांची नाराजी मांडण्यास सुरुवात केली. हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता लक्षात घेऊन शशिकांत तिकोटे यांना लगेच स्थगन प्रस्ताव मांडण्यास सांगण्यात आला.अभ्यास मंडळांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्हसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेक अभ्यास मंडळांवरील नियुक्त्या योग्य प्रकारे झाल्या नसल्याबाबत सदस्यांनी आक्षेप घेतले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी अभ्यास मंडळावर ४५० सदस्यांची नियुक्ती करायची होती, त्यामुळे काही तांत्रिक चुका झाल्याचे स्पष्ट केले.विद्यापीठातले फोनच उचलले जात नाहीतसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये कामानिमित्त फोन केले असता ते उचललेच जात नसल्याची तक्रार सिनेट सदस्य कान्हू गिरमकर यांनी केली. त्याचबरोबर सिनेट सदस्यांना अधिकाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचे अनुभव सदस्यांनी मांडले. सिनेट सदस्य विद्यापीठात आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ