शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सहा शिक्षकांची विनावेतन अर्जाशिवाय दांडी , गटविकास अधिकारी मनोज जाधव यांची कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:41 IST

वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची विनावेतनाची कारवाई गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी नुकतीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची विनावेतनाची कारवाई गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी नुकतीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली.गुरुवारी (दि. १२) तालुक्यातील काही शाळांना भेटी दिल्या. यादरम्यान काही शाळांचे शिक्षक विनापरवाना गैरहजर राहिल्याबद्दल त्यांची रजा विनावेतन करण्यात आली आहे. शाळेत कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज ठेवला नव्हता, तर विनापरवना अनुपस्थित राहिल्याचे गटविकास अधिकारी मनोज जाधव यांच्या निर्दशनास आले, यावरून त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम नं. ३ चा भंग केलेला असल्याने शिस्तभंग कारवाईस पात्र ठरले आहेत. यामध्ये शिवाजी आनंदा लव्हटे, गोविंद महादेव केंद्रे, शंकर बढे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालवड), सुनील अविनाश खंदाडे (जिल्हा परिषद शाळा, कोंढाळकरवाडी), अनंता खाटपे (जिल्हा परिषद खोपडेवाडी), ए. एस. वाडेकर (जिल्हा परिषदशाळा, नाळवट) आदी शिक्षकांचा समावेश आहे.गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी तालुक्यातील शिक्षकांवर केलेल्या या कारवाईमुळे शिक्षकवर्गात सध्या भीतीचे वातावरण असल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय शनिवारी सकाळी शाळा असल्याने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी वेळेत उघडण्यात आल्या होत्या, तर जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक वेळेवर उपस्थित राहिले होते. तालुक्यातील शिक्षकांनी या गोष्टीचा धसका घेतला आहे. सर्व शिक्षक आपापल्या शाळेत वेळेवर जायला लागले असून अध्यापन,स्वच्छता, टापटीपपणा, विविध नोंदी अद्ययावत करण्याच्या मागे लागले आहेत.वेतनवाढ का रोखू नये...?जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोती येथील शाळेस भेट दिली असता येथील शिक्षकांच्या कामात अनियमितता आढळून आली. यामध्ये शाळेच्या वेळेत वर्गाध्यापन न करता कट्ट्यावर बसून सामूहिक गप्पा मारणे, विषयनिहाय अभ्यासक्रमाचे न नियोजन करणे, वर्गसजावट, वर्गव्यवस्था, स्वच्छता टापटीप आदी गोष्टीचा अभाव असणे विद्यार्थी गैरहजर असताना हेतूपुरस्सर हजेरीपटावर विद्यार्थी हजर असल्याची नोंद करणे, तसेच शालेय कामकाज असमाधानकरक अशी विविध कारणांच्या आधारे शालेय कामकाजात असभ्य व हलगर्जीपणा केल्याचे गटविकास अधिकारी यांना दिसून आले.जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम नं. ३ चा भंग केलेला आहे. त्यानुसार आपली वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद का करण्यात येऊ नये? असा सवाल निर्माण करून याचा खुलासा सात दिवसांच्या आत संबंधित केंद्रप्रमुखांच्या शिफारसीसह करावा, असे सांगण्यात आले आहे. हा खुलासा असमाधानकारक नसल्यास किंवा विहीत मुदतीत पंचायत समितीस प्राप्त न झाल्यास सूचित कारवाई करण्यात येईल, असे पत्र जिल्हा परिषद शाळा वरोती येथील उपशिक्षक ज्ञानेश्वर वणवे, प्रशांत भापकर, हनुमान पंजाबराव जाधव, हरिप्रसाद धनंजय सवणे आदी शिक्षकांना गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी दिले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक