आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोरघर गावचे हद्दीत शेळकेवाडी येथे रोहिदास नारायण शेळके (वय ३६, रा. शेळकेवाडी) हा त्याच्या घराच्या बांधकामाच्या भिंतीच्या आडोशाला बिगर परवाना दारू विक्री करत होता. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार अविनाश कालेकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली.
दुसऱ्या घटनेमध्ये घोडेगाव येथे चावडी चौक येथे पिंपळाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत शत्रुंजय बळीराम वाघमारे (रा. घोडेगाव) हा पिंटू शेवाळे (रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव) याच्या सोबत कल्याण मटका चालवत होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एन. एम. वायाळ व पोलीस नाईक व्ही. बी. वाघ करत आहेत.