शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मल्टीप्लेक्सवर आॅगस्टपासून कारवाई : गिरीश बापट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:23 IST

खाद्यपदार्थांची जादा दराने विक्री करणाऱ्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे आणि फूड मॉलवर येत्या एक आॅगस्टपासून कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देआवेष्टीत वस्तू नियमात केंद्र सरकारने केली सुधारणाराज्यातील चव्वेचाळीस मल्टीप्लेक्स व मॉल्सची गेल्या काही महिन्यात तपासणी

पुणे : केंद्र सरकारने आवेष्टीत वस्तू नियमात सुधारणा केली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची जादा दराने विक्री करणाऱ्या मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे आणि फूड मॉलवर येत्या एक आॅगस्टपासून कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिला. तसेच चित्रपटगृहात बाहेरील खाद्य पदार्थ नेणाऱ्या प्रेक्षकाला कुणीही अटकाव करू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विधानपरिषदेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावरील चर्चेनंतर बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. महामार्गावरील फूडमॉल्स, मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे व अन्य मॉल्समध्ये उत्पादकांमार्फत जादा किंमत छापून ग्राहकांची लूट केली जात होती. तशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष मोहिम राबवून अशा उत्पादकांवर कारवाई केली. त्यांच्यावर २०१६-१७ या वर्षात खटले दाखल केले. त्यावर आक्षेप नोंदवून काही उत्पादक न्यायालयात गेले. त्यांनी त्यावर स्थगिती आणली. त्यानंतर राज्य सरकारने जानेवारी २०१७ मध्ये केंद्रसरकारला विनंती करून आवेष्टीत वस्तू नियम २०११ मध्ये सुधारणा करण्याची विनंती केली होती. केंद्रसरकारने एक आॅगस्ट २०१८ पासून वेस्टनावर जादा किंमत छापण्यास प्रतिबंध करणारी अधिसूचना जारी केली. त्यानुसार आता जादा दर आकारणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वेष्टन असलेल्या प्रत्येक वस्तूवर उत्पादकांचे नाव, आयातदाराचे नाव पत्ता, वस्तूंचे नाव, वजन, सर्व करांसह कमाल किरकोळ किंमत, उत्पादन, पॅकिंग व आयात केल्याचा महिना व वर्ष छापणे बंधनकारक आहे. तसेच ईमेल आयडी व दूरध्वनीक्रमांक त्यावर छापणे आवश्यक आहे. या मजकुरात खाडाखोड केल्याचे अथवा नमूद केलेल्या छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याचे आढळल्यास कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्यातील चव्वेचाळीस मल्टीप्लेक्स व मॉल्सची गेल्या काही महिन्यात तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन मॉल्सच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या चित्रपटगृहात बाहेरून खाद्य पदार्थ नेण्यास मज्जाव करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे तसे प्रतिज्ञापत्र सरकार न्यायालयात सादर करणार असल्याचे बापट म्हणाले. ---------------------

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नgirish bapatगिरीष बापटcinemaसिनेमा