शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:27 IST

स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे चारपर्यंत ही कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देमहापालिकेच्या धनकवडी - सहकारनगर आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कारवाई स्थानिकांच्या मनात प्रचंड असंतोष असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी

धनकवडी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी परिसरातील चार व सहकारनगर परिसरातील सहा अशा एकूण दहा मंदिरांवर कारवाई करुन पाडण्यात आली. महापालिकेच्या धनकवडी - सहकारनगर आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ते शनिवारी पहाटे चारपर्यंत ही कारवाई करण्यात आली. बालाजीनगर येथे जिजामाता चौक ते पवार हाँस्पिटलच्या दरम्यान तीन मंदिरांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पवार हाँस्पिटल शेजारी असलेल्या संतसेना महाराज व ज्ञानेश्वर माऊली महाराज, जिजामाता चौकातील बालाजी मंदिर मंडळाचे गणेश मंदिर तर सर्वे नंबर १२ गोविंद हाईट्सच्या बाजूला असलेल्या सिद्धीविनायक मंदिरावर ही कारवाई करण्यात आली.धनकवडी मधील चव्हाणनगर परिसरातील शनिमारुती मंदिराच्या समोर असलेले गणपती मंदिरावरसुद्धा महापालिका अतिक्रमण विभागाने मध्यरात्री ३ वाजता कारवाई करुन पाडण्यात आले. यावेळी शेजारच्या घरानां बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. पोलीस बंदोबस्तात रात्री हे मंदिर पाडल्यामुळे स्थानिकांच्या मनात प्रचंड असंतोष असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आहे.  गणपती मंदिर शेजारी असलेल्या सर्वे नंबर ११ मधील या चाळींच्या घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. यामध्ये रुपाली नरके, शेखर चव्हाण, अनिल नेटके, नरेश परिहार, स्वप्नील लोखंडे यांच्या घरांना कड्या लावल्या. मंदिरात झोपलेल्या अभिमान आरकडे , वय वर्षे ८५ याला काठी मारुन मंदिरातून बाहेर काढले. माझी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे म्हणाले, कारवाई करण्याबाबत दुमत नाही. मात्र, या कारवाई पक्षपाती आहेत. भारतीय जनता पार्टीच्या मंडळांवर या कारवाया न होता राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस व इतर पक्षांच्या मंडळाच्या मंदिरांवर या कारवाया करण्यात आल्या आहेत. नगरसेवक प्रकाश कदम यांच्या बालाजी मित्र मंडळाचे गणेश मंदिरावर कारवाई करुन पाडण्यात आले. यावेळी कदम म्हणाले हे मंदिर तीस वर्षांपूर्वी स्थापन केले. यावेळी येथे लोकवस्ती सुद्धा नव्हती. हळूहळू लोक वस्ती वाढत गेली. मंडळाने पर्यावरण , प्रदूषण,आरोग्य यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे.त्यामुळे नागरिकांची श्रद्धा या मंदिरावर आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होऊन केल्या आहेत.

टॅग्स :DhankawadiधनकवडीSahakar NagarसहकारनगरPoliceपोलिसEnchroachmentअतिक्रमण