शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात शिवदुर्गला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 08:51 IST

 लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पुण्यातील सचिन लल्लन उपाध्याय (वय 21) या युवकाला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात येथिल शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना यश मिळाले.

लोणावळा : लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पुण्यातील सचिन लल्लन उपाध्याय (वय 21) या युवकाला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात येथिल शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना यश मिळाले. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती.सचिन उपाध्याय हा त्यांच्या काही मित्रांच्या सोबत रविवारी (दि.४) लोणावळ्यात फिरायला आला होता. दुपारच्या सुमारास ते सर्व मित्र लायन्स पॉईट येथिल दरीला लावण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगच्या पुढे असलेल्या अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मस्ती करत असताना सचिनचा पाय घसरला व तो दरीत पडला. सुदैवाने 60 फुट अंतरावर एका झाडाच्या खोडाला तो अडकला. अंगाला मुका मार लागला होता व दरीच्या वर येण्याकरिता मार्ग नसल्याने तो स्वतःला वाचविण्याकरिता याचना करत होता त्याचे मित्रदेखिल प्रयत्न करत होते. या दरम्यान शिवदुर्गचे वैभव शेलार यांना लायन्स पॉईटच्या दरीत एक युवक पडला असल्याचा फोन आला व लोणावळ्यातील शिवदुर्गची टिम तातडीने रेस्कूचे सर्व साहित्य गोळा करत लायन्स पॉईटकडे रवाना झाली. घटनास्थळाचा अंदाज घेत अजय शेलार व प्रविण देशमुख हे दरीत उतरले, हार्निस व दोरच्या सहाय्याने त्यांनी सचिन उपाध्याय याला सुखरुपपणे दरीतून बाहेर काढले. शिवदुर्ग मित्रचे प्रविण देशमुख, वैभव शेलार, अभिजीत बोरकर, समीर जोशी, पुनिकेत गायकवाड, तुषार केंडे, राजेंद्र कडु, अजय राऊत, प्राजक्ता बनसोड, वैष्णवी भांगरे, सुनिल गायकवाड हे या मोहिमेत सहभागी झाले होते.