शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगाराला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 20:08 IST

विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मयूर जयसिंग गायकवाड (वय २४, रा. टेल्को कॉलनी नंबर २, राजगुरुनगर, ता. खेड) यास खेड पोलिसांनी शनिवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्दे२०,००० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस जप्त

राजगुरुनगर : विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मयूर जयसिंग गायकवाड (वय २४, रा. टेल्को कॉलनी नंबर २, राजगुरुनगर, ता. खेड) यास खेड पोलीसांनी शनिवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले. आरोपीविरोधात खेड पोलीस ठाण्यात गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांंना दूरध्वनीवरुन एक व्यक्ती गावठी पिस्तुलाने वाडा रस्त्यावरील पाण्याची टाकी चौकात रिक्षावाला व पथारीवाले यांना धमकावत आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार आर के नलावडे, एस आर मांडवे, व्ही जे पाटील, एस जे बनकर आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गायकवाड त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २०,००० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळुन आले. पोलीस नाईक राजेश नलावडे यांनी खेड पोलीस ठाण्यात गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ............स्थानिक गुन्हे शाखेने तौसिक शेख व अमर शेवाळे यांना राजगुरुनगर परिसरात गावठी पिस्तूलासह नुकतेच पकडले होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी या परिसरात काहींना पिस्तुल विक्री केल्याचे सांगितले. गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याने शेवाळे याच्याकडून दहा हजारांना पिस्तुल विकत घेतले होते. राजगुरुनगर परिसरात अनेकांकडे गावठी पिस्तुले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लवकरच त्यांना सर्व आरोपींना तडीपार करून मोक्का लावणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक