शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाला भूमी अभिलेखकडून मनस्ताप, माजी सैनिक भाऊसाहेब भोंगळे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:45 IST

दौंड भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी बी. एम. ताकभाते व बांधकऱ्याने संगनमताने आपल्या जमिनीची शासकीय गाव नकाशानुसार मोजणी केली नाही; तसेच या कर्मचा-याने शासकीय पदाचा दुरुपयोग करीत मानसिक त्रास दिल्याचा आरोप, मळद (ता. दौंड) येथील माजी सैनिक भाऊसाहेब नारायण भोंगळे यांनी केला आहे.

बारामती - दौंड भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी बी. एम. ताकभाते व बांधकऱ्याने संगनमताने आपल्या जमिनीची शासकीय गाव नकाशानुसार मोजणी केली नाही; तसेच या कर्मचा-याने शासकीय पदाचा दुरुपयोग करीत मानसिक त्रास दिल्याचा आरोप, मळद (ता. दौंड) येथील माजी सैनिक भाऊसाहेब नारायण भोंगळे यांनी केला आहे.भाऊसाहेब भोंगळे यांच्या पत्नी सुनीता भाऊसाहेब भोंगळे यांची मळद गावाच्या हद्दीत गट क्र. ५२५ मध्ये ५८ गुंठे क्षेत्र आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये बांधकरी यांनी भोंगळे यांच्या मालकीच्या शेतात चुन्याने मार्किंग करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी माजी सैनिक भाऊसाहेब भोंगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस ठाण्याने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये बांधक-यांनी भाऊसाहेब भोंगळे यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी रावणगाव पोलीस ठाण्यात भोंगळे यांनी तक्रार दाखल केली.भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करून घेण्याचा सल्ला यावेळी पोलिसांनी भोंगळे व बाधक-यांना दिला. या गटाच्या मोजणीचे पैसे सुनीता भोंगळे यांनी दौंड भूमिअभिलेख कार्यालयात भरले. कर्मचारी बी. एम. ताकभाते यांनी या गटाची मोजणी केली. मोजणी करीत असताना गावनकाशानुसार केली गेली नसल्याचा आरोप, भोंगळे यांनी केला आहे. तसेच सुनीता भोंगळे यांनी मोजणीचे ९ हजार रुपये भरले असताना देखील ताकभाते यांनी बांधक-याकडून ५ हजार ५०० रुपये घेतले असाही आरोप भोंगळे यांनी केला आहे.याबाबत भोंगळे यांनी मे २०१७ मध्ये जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, भूमिअभिलेख अधीक्षक व दौंड येथील भूमिअभिलेखा उपअधीक्षक यांना पत्रव्यवहार करून ताकभाते यांच्याबद्दल तक्रार केली. तसेच गावनकाशानुसार पत्नीच्या नावे असणाºया जमिनीची पुन्हा मोजणी करून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, हा प्रकार गंभीर असून याची अद्याप दखल घेतली नसल्याचे भोंगळे यांनी सांगितले.माझ्या कुटुंबाला व मला त्रास देणे सुरूच आहे. स्वमालकीची जमीन असतानादेखील त्यावर बांधकरी अतिक्रमण करीत आहेत. शासन दरबारी न्याय मागावा तर कोणी दखल घेत नाही. भूमिअभिलेखाचे कर्मचारी बी. एम. ताकभाते चुकीच्या पद्धतीने जमिनीची मोजणी करतात. महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांना त्रास देणाºया व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास टाळाटाळ करणाºया शासकीय कर्मचारी व अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा अध्यादेश सप्टेंबर १९९७ साली काढला आहे. देशासाठी सेवा बजावून् सुद्धा आमची अशी अवहेलना होत असेल तर सामान्य जनतेचे काय?- भाऊसाहेब भोंगळे

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या