शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात धोरणानुसार ११४ कोटींच्या उत्पन्नावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:52 IST

प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या जाहिरात प्रस्तावावरून सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी विरुद्ध प्रशासन अशा पद्धतीने वाद सुरू आहेत.

पुणे : प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या जाहिरात प्रस्तावावरून सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी विरुद्ध प्रशासन अशा पद्धतीने वाद सुरू आहेत. त्यामुळे तब्बल ५४ कोटींचे वाढीव उत्पन्न मिळू शकणाऱ्या प्रशासनाच्या प्रस्तावावर स्थायी समिती आणि सत्ताधारी भाजपा काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.नवीन जाहिरात धोरणानुसार महापालिकेला तब्बल ११४ कोटींचे उत्पन्न मिळू शकेल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून नव्याने करण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आला. स्मार्ट सिटीकडून आलेल्या प्रस्तावानुसार महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार तब्बल ५४ कोटींचे अधिक उत्पन्न मिळणार आहे.महापालिकेच्या जागांवर जाहिरातफलक उभारण्याबाबत स्मार्ट सिटीकडून महापालिकेला प्रस्ताव दिला होता. महापालिकेला ६० कोटींचे उत्पन्न मिळेल, असे त्यात स्पष्ट केले. स्थायी समिती आणि मुख्य सभेने प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र, प्रस्तावाच्या फेरविचाराचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला दिला आहे. महापालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यास अधिक उत्पन्न मिळेल, असा दावा आयुक्तांनी केला होता. त्यावर स्थायी समितीने प्रशासनाचा फेरविचाराचा प्रस्ताव एक महिना पुढे ढकलत प्रशासनाने उत्पन्नवाढीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते.प्रशासनाने मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत नवीन जाहिरात धोरणाचे सादरीकरण केले. त्यात उद्याने, अग्निशमन केंद्राच्या जागा, सर्व जलशुद्धीकरण व मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, तसेच शहरातील सर्व स्वच्छतागृह, १० हजार विद्युत खांब आणि २५० रिकाम्या जागा यावर जाहिरात फलकास परवानगी दिल्यास ८३ कोटींचे उत्पन्न मिळेल, अस्तित्वातील जाहिरात फलकांचे ३१ कोटी असे एकूण ११४ कोटींचे उत्पन्न मिळेल, असा दावा केला. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाचे सादरीकरण केले.