शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:47 IST

रस्त्याच्या मागणी : दुचाकी, चारचाकी व अवजड कंटेनरचे अपघात झाले नित्याचे

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर असलेल्या दोन्ही धोकादायक वळणांमुळे दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.१२) पहाटे तीनच्या सुमारास वळणावर शिक्रापूरहून - चाकणकडे जाणारा अवजड कंटेनर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. वारंवार होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग पुणे जिल्ह्यातील तीन ते चार महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ता आहे. परिणामी, या मार्गावर कायम वर्दळ असते. परराज्यातून औद्योगिक वसाहतींना कच्चा माल पुरविणारे असंख्य अवजड कंटेनर याच मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अपघातातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यमार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत साबळेवाडीच्या तसेच शेलपिंपळगावच्या पश्चिमेला ‘एस’ आकाराची धोकादायक वळणे आहेत. ही दोन्ही वळणे धोकादायक आहेत. या वळणावर रोज अपघात होत आहेत.

भीमा - भामा नदीलगत असलेल्या शेलपिंपळगावच्या वळणावर गॅसचे टँकर, ट्रक, मालवाहू गाड्या, दुधाचे ट्रक वळण घेत असताना सातत्याने पलटी होत आहेत. शेलपिंपळगावच्या वळणालगत भीमा-भामा नदीचा प्रवाह असल्याने सकाळपासून अनेक वाहतूकदार अंघोळीसाठी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतुकीत अडचण निर्माण करतात. यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातसदृश परिस्थीती निर्माण होते. तर, साबळेवाडीचे वळण चाकणकडून शिक्रापूरकडे जाताना चढ वाहतुकीचे आहे. त्यामुळे मुंबई, नाशिककडून औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल घेऊन येणारी अवजड वाहने येथील वळणावर वाहतुकीदरम्यान अडकली जातात. मात्र, शिक्रापूरकडून चाकणबाजूकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना रस्त्याचा उतार धोकादायक ठरत असल्याने बहुतांशी वाहने जागीच पलटी होत आहेत. रस्त्यावरील दोन्ही ठिकाणच्या वळणांवर वाढते अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहतूकदारांकडून केली जात आहे.साबळेवाडी येथील वळणावर सातत्याने अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे, वळणाला कठडे उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. सूचना फलक व कठडे तातडीने बसविणे गरजेचे आहे.- सुनील बेंडभर, स्थानिक नागरिक.शेलपिंपळगाव वळणालगत असलेली झाडे वाढली आहेत. त्यामुळे शिक्रापूरकडून चाकणकडे जाणाºया वाहनांना समोरच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडून येत आहेत. वळणाच्या दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली तर त्याठिकाणचे अवैध पार्किंग बंद होईल. - विद्या मोहिते, सरपंच शेलपिंपळगाव.४महामार्गावरील दोन्ही धोकादायक वळणांवर सातत्याने मोठ-मोठे अपघात होत आहेत. परिणामी जीवितहानीचा आकडा वाढत चालला आहे. शेलपिंपळगावच्या वळणावर गेल्या वर्षभरात दहा ते बारा, तर साबळेवाडीच्या वळणावर पंधरा ते वीस वाहने वाहतुकीदरम्यान पलटीझाली आहेत.४वळणावर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणावरील सूचना फलक जमीनदोस्त झाले असून जे सूचना फलक उभे आहेत ते अनेक व्यावसायिकांच्या स्वत:च्या जाहिरातीला बळी पडत आहेत. तर, साबळेवाडीच्या वळणाचे संपूर्ण कठडे तुटलेले आहे. परिणामी अपघातग्रस्त वाहने थेट खोल दरीत कोसळलीजात आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड