शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 4:32 PM

काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. 

ठळक मुद्देजंगी पलटणला २५० वर्षे पूर्ण 

पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या युद्धपद्धतीमुळे पूर्वसूचनेचा अवधी कमी झाला आहे. त्यामुळे युद्धाच्या तयारीसाठी फारसा अवधी सैन्याकडे उपलब्ध नसतो. अशा प्रकारच्या युद्धपद्धतीला सामोरे जाण्यासाठी आपणदेखील स्वत:ला सज्ज ठेवले पाहिजे. काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. लष्कराच्या मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट म्हणजेच जंगी पलटनच्या स्थापनेला यंदा २५० वर्षे पूर्ण होताहेत. यानिमित्त लष्करातर्फे आयोजित कार्यक्रमात या सैन्य तुकडीचे माजी सैनिक आणि वीरनारी यांना सन्मानित करण्यात आले. या रेजिमेंटचे सर्वोच्च पदावर कार्यरत असणारे लेफ्टनंट जनरल आम्ब्रे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आम्ब्रे म्हणाले, देशाच्या लष्करी इतिहासात जंगी पलटनची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. पहिले महायुद्ध, सियाचीन येथील लढाई अशा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये पलटनने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या तुकडीच्या पूर्वजांनी आपल्या शौर्य, साहस व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक मोहिमा यशस्वी करत, पलटनचा स्तर उंचावला आहे. त्यामुळेच या पलटनमध्ये सैनिक म्हणून निवड होणे ही अतिशय अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे.आम्ब्रे यांनी पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण ठेवत तो कायम ठेवण्याची जबाबदारी आताच्या जवानांवर आहे. हा इतिहात सदैव स्मरणात ठेवून त्याला आणखी दैदीप्यमान कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.  मुलामुळे युनिटचा सन्मान वाढला...माझ्या निवृत्तीनंतर माझा मुलगा माझ्याच जागी फर्स्ट मराठांच्या जंगी पलटणमध्ये सहभागी झाला. त्याच्या लष्करातील सेवेला दोन वर्षे पूर्ण झाले होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंका येथे एलटीटीईच्या विरोधात लढण्यासाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला. यात माझा मुलगा बाजीराव तरटे याचीही निवड झाली. माज्याच युनिटमध्ये असल्याने माझे वरिष्ठ भेटल्यास माझा नमस्कार सांग असे त्याला सांगितले. मात्र, शांतीसेनेत असताना त्याला वीरमरण आले. त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला गौरवण्यात आले. माज्या मुलामुळे माज्या युनिटचा सन्मान वाढला याचा मला गौरव आहे, असे गौरवोद्गार निवृत्त सैनिक दत्तात्रेय तरते यांनी काढले. ........................वीरमाता, वीरनारी, वीर पित्यांचा सत्कारफर्स्ट मराठा लाईट इन्फ न्ट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली. या दैदीप्यमान काळात या बटालियनने अनेक युद्धात सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली. १९४७, १९६२ तसेच १९७१, आॅपरेशन पवन या सारख्या युध्दांमधे देशासाठी वीरगती प्राप्त कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्तीत वीरमाता, वीरनारी आणि वीर पित्यांना आपल्या स्वकीयांच्या आठवणीने आणि त्यांच्या पराक्रमाने उर भरून आला...................11 डिसेंबर 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धात आमच्या जमालपूर आणि कामालपूर ताब्यात घेण्यासाठी  चढाई केली. यावेळी आमचा सामना तेथे तैनात असलेल्या 31 बलुच या पाकिस्तानी तुकडीशी झाला. आम्ही जांबलपूरला चारही बाजूने घेरले. यावेळी 31 बलुच रेजिमेंटचे कामांडन्ट कर्नल सुलतान अहमद यांना शरण येणासाठी पत्र पाठविले. मात्र अहमद यांनी त्या पाकिटात बंदुकीची होळी पाठवून उद्धभूमीत भेटु असे सूतोवाच केले. यावेळी आम्ही हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजच जय घोष करत शत्रूच्या रेजिमेंट वर तुटून पडलो.

.................... जंगी पलटणने अतुलनीय शौर्य दाखवत जमालपूर ताब्यात घेतले,ह्णअशी आठवण या युद्धात सहभागी झालेले लातूरच्या मंगलगिरी यांनी  सांगितली. आता मला निवृत्त होऊन ३१ वर्ष झाली, पण ह्यजंगी पलटणने माझी आठवण ठेवली आणि मला इथे बोलावले याचे समाधान आहे, असेही मंगलगिरी यांनी सांगितले.

    

टॅग्स :Puneपुणे