शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अतिवेग, लेन कटिंगमुळे एक्स्प्रेसच्या अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:03 IST

द्रुतगती मार्ग : अवजड वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन

विशाल विकारी लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांचा अतिवेग व लेन कटिंग अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. शुक्रवारी या मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या अपघात याच कारणांमुळे झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातात निष्पाप पाच जणांचा बळी गेला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा ते खोपोली फुडमॉल हा घाट परिसर आहे. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूककोंडी व अपघात होतात. या परिसरात अवजड वाहनांच्या चालकांकडून होणारी लेन कटिंगची मोठी समस्या आहे.

घाट चढताना किंवा उतरताना या परिसरात सर्रास लेनच्या शिस्तीचे उल्लंघन होताना पाहायला मिळते. लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या असतानाही अवजड वाहनांच्या चालकांकडून वारंवार नियमांचा भंग केला जात आहे. तसेच या वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्तीची माल वाहतूक केली जाते. त्यामुळे अशी वाहने घाट परिसरात बंद पडण्याचे प्रकार घडतात. आरटीओने घालून दिलेल्या नियमांना आर्थिक बाजूने बगल देत या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असते.इंधन वाचविण्यासाठी वाहन न्यूट्रल१शनिवार व रविवार, सलग सुटी व गर्दीच्या काळात अवजड वाहनांना घाट परिसरात बंदी घालण्यात येते. यानंतर मात्र एकाच वेळी ही वाहने सोडली जात असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. बहुतांश वेळा घाट उतरताना अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्याकरिता वाहन न्युट्रल करतात. त्यामुळे वेळप्रसंगी ब्रेक न लागणे, नियंत्रण सुटणे असे प्रकार घडून अपघात होतात.लेनचे नियम पाळले, तर दुर्घटना टळेलशुक्रवारी अपघात झालेला सिमेंटचा ट्रक लेन कटिंग करत वेगाने पहिल्या लेनमधून भरधाव जात होता. या वेळी तीव्र वळण व उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रक पुण्याच्या दिशेने जाणाºया वाहनांच्या लेनवर पडला. हाच ट्रक ठरवून दिलेल्या तिसºया लेनमधून नियंत्रित वेगात गेला असता, तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. 

टॅग्स :Puneपुणे