शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

तुटीच्या करवाढीचे ग्रहण टळले, स्थायी समितीची खास सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 03:32 IST

महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेने मात्र करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला आहे.

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेने मात्र करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे सध्या तरी पुणेकरांवरील करवाढीचे ग्रहण टळले आहे.महापालिका प्रशासनाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकरात १५ टक्के वाढीबरोबरच पाणीपट्टीतही १२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकित आयत्या वेळी सादर केला होता. त्यात मिळकतकरातील सर्वसाधारण करात ४ टक्के, सफाईकरात ४.५ टक्के, अग्निशमनकरात ०.५० टक्के, जललाभ करात १.२५ टक्के, जलनिस्सारण लाभकरात २.५० टक्के, तर मनपा शिक्षणकरामध्ये २.२५ टक्के वाढीचा हा प्रस्ताव ठेवला होता.हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर सर्वसाधारण पाच हजार रुपये मिळकतकर भरणाºया नागरिकांना वाढीव करापोटी साडेसातशे रुपये अधिक भरावे लागले असते.या करवाढीमुळे मिळकतकराचे उत्पन्न १३५ कोटी २२ लाख रुपयांनी वाढले असते.करनिश्चितीला २० फेब्रुवारीपूर्वी मान्यता घेणे बंधनकारकमहापालिकेला विविध मार्गांनी मिळणारे उत्पन्न आणि विकासकामांसाठी होणारा खर्च यांचा ताळमेळ घालण्यासाठी ही करवाढ आवश्यक असल्याचा दावा आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या प्रस्तावात केला आहे. प्रशासनाने यापूर्वी करवाढीचा प्रस्ताव आणला, मात्र त्यात सुधारणा करण्यासाठी तो पुन्हा मागे घेण्यात आला होता.महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी दरवर्षी कर निश्चितीला २० फेबु्रवारीपूर्वी मान्यता घेणे बंधनकारक आहे. यामुळे आयुक्तांचा करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या खास सभेपुढे ठेवण्यात आला होता. गुरुवारी झालेल्या खास सभेने मात्र प्रशासनाचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी सत्ताधारी करवाढीसाठी अनुकूल असले तरी विरोधकांकडून होणारी टीका टाळण्यासाठी हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला असता तर मुख्य सभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला असता. त्यानंतर मुख्य सभेची मान्यता घेऊन पुणेकरांवर १५ टक्के करवाढीचा बोजा टाकण्यात आला असता.

टॅग्स :Puneपुणे