शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भाजपावर पराभवाची नामुष्की, सदस्यांची अनुपस्थिती भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:41 IST

हद्दीबाहेरच्या गावांना मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याच्या विषयावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पराभव पदरी घ्यावा लागला.

पुणे : हद्दीबाहेरच्या गावांना मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याच्या विषयावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पराभव पदरी घ्यावा लागला. सभागृहात ९८ अशी सदस्यसंख्या असूनही अनेक सदस्य अनुपस्थित असल्यामुळे ही नामुष्की त्यांच्या पदरी आली. असा निधी द्यायचा असेल तर एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांची मंजुरी आवश्यक होती व ती नसल्याने त्यांचा तांत्रिक पराभव झाला.विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी चांगली मोर्चेबांधणी केली. ती भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात आली नाही. आपले सदस्य जास्त आहेत, या समजावर त्यांनी विषय मतदानाला जात असताना तो थांबवायचे सोडून जाऊ दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांनी एकट्याने या विषयाला विरोध केला. त्यामुळे त्यावर मतदान झाले.मतदानाच्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे ठरावाच्या बाजूने भाजपाच्या उपस्थित सदस्यांची ६८ मते व शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची ६ अशी ७४ मते पडली. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ८२ मतांची आवश्यकता होती. त्यामुळे नगरसचिव सुनील पारखी यांनी तांत्रिक कारणामुळे ठराव असंमत असे जाहीर केले.पालकमंत्री गिरीष बापट यांनी या विषयाला गती दिली होती. महापालिकेच्या कात्रज तलावाच्या वरच्या बाजूला पण हद्दीबाहेर मांगडेवाडी, भिलारेवाडी व गुजर निंबाळकरवाडी अशा ग्रामपंचायती आहेत. तेथील मैलापाणी तसेच सांडपणी कात्रजच्या तलावात येत असते. त्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यासाठी त्या गावांना मलनि:सारण व्यवस्था करून देण्यासाठी म्हणून १० कोटी रुपयांचा निधी महापालिकेने द्यावा, असा विषय होता.स्थानिक नगरसेविका मनीषा कदम यांनी तो मांडला. त्यांनी तसेच राणी भोसले, सुशील मेंगडे, आदी सदस्यांनी त्यावर भाषणेही केली. हा निधी देणे कसे आवश्यक आहे, ती गावे येत्या काही वर्षांत महापालिकेत येणारच आहेत, कात्रजच्या तलावाचे पाणी कसे स्वच्छ राहील, असे बरेच मुद्दे त्यांनी मांडले.मनसेच्या वसंत मोरे यांनी या ठरावाला तीव्र विरोध केला. या ग्रामपंचायतींना महापालिका पाणी पुरवते. पाणीपट्टी पोटी त्यांनी एक पैसाही कधी दिलेला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत त्या गावांमध्ये मताला साडेबारा हजार रुपये भाव देण्यात आला.अनधिकृत बांधकामांनी ही गावे गजबजली आहेत. तेथील इमारतींना सांडपाणी, मैलापाणी व्यवस्था नाही. ती करून देण्याचा हा प्रकार आहे. त्याला आपला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली.त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबूराव चांदेरे, प्रकाश कदम, योगेश ससाणे, भय्या जाधव यांनी हडपसरमधील पाणीस्रोत असेच आसपासच्या गावांमुळे खराब होत आहेत, तिथेही असाच निधी दिला जाईल का, अशी विचारणा केली. ससाणे व जाधव यांनी तर विषयाला लगेच उपसूचनाही दिली.उपसूचना आल्यामुळे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची अडचण झाली. ती स्वीकारली तर निधी द्यावा लागेल व नाकारली तर मतदान घ्यावे लागेल, अशा स्थितीमुळे काय निर्णय घ्यावा, अशा पेचात ते सापडले. त्याचा फायदा विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी उचलला. मोरे विरोध करणार, हे लक्षात घेऊन ते या विषयावर तटस्थ राहिले. त्यामुळे मतदान होऊन भाजपाचा हा प्रस्ताव तांत्रिक कारणाने रद्द झाला. त्यानंतर बराच वेळ सभागृहात भाजपाचे सदस्य एकत्र येऊन चर्चा करत होते. सोमवारच्या सभेतच अडीच एकरांचा भूखंड मूळ मालकाला परत करण्याच्या ठरावावर भाजपाबरोबर एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी त्याच्या दुसºयाच दिवशी म्हणजे मंगळवारी त्यांना त्यांच्याच विषयावर सभागृहातच अस्मान दाखवले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा