शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांपासून सावधान ! पुण्यात दाेन हजारहून अधिक नागरिकांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:44 IST

पुणे अाणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत वाढत असून गेल्या दाेन महिन्यात पुण्यात दाेन हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये वाढतीये कुत्र्यांची दहशदउघड्यावरील कचऱ्यामुळे वाढतीये कुत्र्यांची संख्या

पुणे : कुत्रा हा मानवाच्या जवळचा मित्र असताे असे म्हंटले जाते, मात्र हाच कुत्रा अाता मानवाचा शत्रू बनत चालला असल्याचे चित्र अाहे. महापालिकेच्या राेजच्या अहवालानुसार जानेवारी अाणि फेब्रुवारी या केवळ दाेन महिन्यात पुण्यातील तब्बल दाेन हजार पासष्ट नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असून यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली अाहे.      नुकताच पिंपरी-चिंचवड मध्ये घराच्या अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके ताेडल्यामुळे ते मुल गंभीर जखमी हाेऊन मृत्यूमुखी पडले. लहान मुलांना भटकी कुत्री चावल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून घडली अाहेत. त्याचबराेबर दुचाकींच्या मागे ही भटकी कुत्री लागल्यामुळे अनेकांचे अपघातही झाले अाहेत. यंदाच्या वर्षी महापालिकेच्या अहवालानुसार जानेवारीमध्ये 821 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला हाेता तर फेब्रुवारी महिन्यात तब्बल 1244 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला हाेता. याचे गणित केल्यास फेब्रुवारी महिन्यात दिवसाला तब्बल 44 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे स्पष्ट हाेत अाहे.     या भटक्या कुत्र्यांच्याविराेधात पालिका प्रशासन पाऊले उचलत असलं तरी ती पुरेशी नसल्याचे दिसून येत अाहे. उघड्यावर फेकण्यात येणारा कचरा, फेकण्यात येणारे खरकाटे अन्न यांमुळे या भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. पालिका प्रशासनाला या कुत्र्यांची नसबंदी करताना अनेक गाेष्टी लक्षात घ्याव्या लागत असल्याने हा उपाय पुरेसा उपयाेगी पडत नसल्याचे चित्र अाहे. तसेच काही नागरिकांकडूनही या भटक्या कुत्र्यांना अन्न टाकण्यात येत असल्याने साेसायटींच्या बाहेरही त्यांची संख्या वाढत अाहे. कुत्रा चावल्याने रेबिज सारखे अाजार हाेत असल्याने तसेच इंजेक्शनचा काेर्स करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये या कुत्र्यांबद्दल धास्ती निर्माण झाली अाहे.     

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य